आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. मालिकेत अनेक रंजक वळणामुळे मालिका चर्चेत असते.या मालिकेचा सध्या मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतो.मालिकेत सध्या आशुतोष आणि अरुंधती यांचा सुखी संसार सुरु आहे,तर ईशाच्या साखरपुड्याची तयारी सुरु असलेली दिसते. मालिकेत सध्या ईशा आणि अनिशच्या लग्नाची बोलणी सुरु आहे. त्यांच्या नात्याला नाव मिळण्यासाठी आता साखरपुडा करावा असा निर्णय आता केळकर आणि देशमुख कुटुंबाने घेतलाय.तसेच अरुंधतीच्या अनेक प्रयत्नांनंतर अनिरुद्ध देखील ईशाच्या साखरपुढ्यासाठी तयार झालाय यामुळे देशमुख कुटुंब आनंदी आहे. तर अश्यातच दुसरीकडे आशुतोष आणि अरुंधती यांची हनिमूनची तयारी सुरु आहे.(Arundhati Aashutosh Honeymoon)

आजच्या भागात आशुतोष नितीनला अरुंधती हनिमूनला येण्यासाठी तयार झाली हे सांगतोय. आणि हे ऐकून नितीन देखील खुश झाला. तर आता अरुंधती-आशुतोष कोणत्या ठिकाणी हनिमूनला जाणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झालेत. मालिकेत आशुतोष अरुंधतीला नेहमी साथ देताना दिसतो. तो तिची काळजी देखील घेतो हे पाहून अरुंधती अनेकदा भारावते.(Arundhati Aashutosh Honeymoon)
हे देखील वाचा: साईशा झाली मल्हारची नवीन हेअरस्टाईलीश,व्हिडीओ व्हायरल
मालिकेत दुसरीकडे ईशा अनिशचा साखरपुड्याची तयारी सुरु असतात माझा साखरपुडा मोठा थाटामाटात करायचा असा हट्ट ईशा करते. कांचन आई,संजना आप्पा तिची समजूत काढतात.पण ईशा सगळ्यांवर चिडते. अरुंधती देखील ईश्वर चिडते.तू आधी कमव आणि मोठायचं निर्णय मोठयांना घेऊ दे असे खडेबोल सुनावल्यावर ईशा शांत होते. पण आता ईशाच्या ह्ट्टपणामुळे त्यांच्या साखरपुड्यात काही विघ्न येणार का? हे पाहणं देखील आता रंजक ठरेल.
