आई कुठे काय करते ही मालिका आज सर्वत्र पाहिली जाते. मालिकेत विविध अंग पाहून प्रेक्षक नेहमी आश्यर्यचकित होतात. हे कथा ज्या अरुंधती या पात्र भोवती फिरते त्या पात्राच्या आयुष्यात अनेक अडचणी येताना पाहायला मिळतात तरीही धैर्याने सामोरं जाऊन त्या अडचणींना अरुंधती उत्तर देते. एका लग्नानंतर पतीच्या विनाकारण त्राग्या ने वैतागून दुसरं लग्न अरुंधतीने केलं. आशुतोष सोबत दुसरं लग्न नंतर केल्यानंतर देशमुख कुटुंबातुन अरुंधती दुसऱ्या घरी राहायला गेली पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे देशमुखांशी जोडली जाते.(Arundhati Confess Her Love)

अरुंधतीच लग्न झालं खरं पण आता अरुंधती ने अजूनही आशुतोषला त्याच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली नाही. आशुतोष ही या दिवसाची वाट बघत आहे आता आशुतोष ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. मालिकेच्या येत्या भागात अखेर अरुंधती लाजत, घाबरत आशुतोषला त्याच्या वरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. अरुंधती ने प्रेमाची कबुली दिल्या नंतर आशुतोषच्या चेहऱ्यावर गगनात न सामावणारा आनंद दिसत आहे.
हे देखील वाचा – ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
मालिकेत सध्या इशा आणि अनिश च्या साखरपुडयाचा ट्रॅक चालू आहे. तर दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध मध्ये फारसं काही चांगलं घडताना दिसत नाही. अनिरुद्ध ने संजनाच्या कामाच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घातला. आणि नंतर अनिरुद्ध ने संजनाची माफी ही मागितली पण संजना ने अनिरुद्धला कधी ही माफ न करण्याच्या निर्णय घेतल्याचं मालिकेत पाहायला मिळतंय. तर मालिकेत आता इशा आणि अनिशचा साकारपूडा, संजना अनिरुद्धच भांडण, आशुतोष आणि अरुंदीतच पुढचं आयुष्य कस पार पडणार हे पाहाणं रंजक ठरणार आहे.(Arundhati Confess Her Love)