‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सातत्याने नवनवीन वळण येत असतात. मालिकेतील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयातील सहजता प्रेक्षकांचं मन जिंकते.त्यामुळेच नवनवीन मालिकांमध्ये देखील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे. (aai kuthe kay karte)
अनिरुद्धचा सुरुवातीपासूनच ईशाच्या लग्नाला विरोध होता,त्यानंतर विना सोबतच्या त्याच्या बिजनेसमुळे तो या लग्नसाठी परवानगी देतो. पंरतु विनासमोर अनिरुद्धचा खरा चेहरा आल्यानंतर विना अनिरुद्धसोबत संबंध तोडून टाकते, म्हणूनच अनिरुद्धचा पुन्हा ईशा-अनिशच्या लग्नाला विरोध असतो. तर सध्या मालिकेत ईशाने सगळ्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे.
पाहा काय घडलं आजच्या भागात? (aai kuthe kay karte)
आजच्या भागात अनिरुद्ध ईशाने जन्मदात्या वडिलांपेक्षा काल आलेल्या मुलाला निवडलं त्यात अनिरुद्धने कस आपल्या पोटच्या मुलीला घराबाहेर काढलं.हे सगळं आठवून त्याला वाईट वाटत.कांचन आई आणि अप्पा त्याची ही अवस्था बघतात तेव्हा कांचन आई अप्पांना म्हणतात तुम्ही अनिरुद्धला समजवा.तेव्हा,अप्पा म्हणतात हे सगळं त्यानेच ओढवून घेतलं आहे. (akkk latest episode)

तर इकडे अरुंधती अनिश व ईशाचाच विचार करत बसलेली असते.तेव्हा आशुतोष तिला समजावतो आणि म्हणतो आपण कोणीच त्यांचं स्वागत नीट केलं नाही. आपण रीतीप्रमाणे त्यांचं लग्न लावून द्यायला हवं. तर इकडे इशा सगळे नाराज असतात म्हणून काळजीत असते.तेवहा अनिश तिची समजूत काढत म्हणतो आपण मिळून सगळं ठीक करू. आता, ईशा-अनिशच्या लग्नामुळे देशमुख-केळकरांच्या आयुष्यात काय उलथापालथ होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
हे देखील वाचा : ‘खतरोंके के खिलाडी १३’ मधून अभिनेत्री अंजुम फाकीह पडली बाहेर, जाणून घ्या काय आहे कारण?