आई कुठे काय करते, या मालिकेत सध्या वटपौर्णिमेची तयारी सुरु आहे, देशमुख केळकर दोन्ही कुटूंबामध्ये वटपौर्णिमीची लगबग पाहायला मिळते आहे.अरुंधती आणि आशुतोषची ही पहिलीच वटपौर्णिमा आहे. कांचन आईनी अरुंधतीला देशमुखांकडे तिला बोलवलं आहे, बघूया अरुंधती तिची आशुतोशसोबतची पहिली वटपौर्णिमा कुठे साजरी करते.(Sanjana Anirudh Relation)
पाहा काय घडलं आजच्या भागात? (Sanjana Anirudh Relation)
देशमुखांकडे कांचन आई अनघा वटपौर्णिमेची पूजा करणार म्हणून खुश असते तेव्हा अभि म्हणतो आजी मी देखील उपवास केला आहे,सगळे वटपौर्णिमा साजरे करणार आहेत फक्त संजना करणार नाही म्हणून कांचन आई थोडी नाराज आहे. तितक्यात संजना तिकडे आणि ती कांचन आईंना समजावते की आज पर्यंत मी सगळे उपवास केले,पण त्याचा काही उपयोग झाला नाही.तर केळकरांकडे सुलेखा ताई अरुंधतीला सांगतात की,कांचन ताईचा मला फोन आला होता तर तू आणि आशु तिकडे जा यावर आशुतोष देखील तयार होतो. त्यांचं हे बोलणं ऐकून विना मात्र अरुंधतीला देशमुखांकडे जाण्यासाठी नकार देते.तीच म्हण असत अरुंधती सारखी तिकडे जात राहिली तर अनिरुद्धला त्रास होईल त्याच्या मनाचा कोणी विचार करत नाही.
यावर अरुंधती विनाला स्प्ष्ट उत्तर देते. मला माहित आहे कि मी देशमुखांमध्ये अजूनही अडकून आहे, पण तिकडे मी आई , अप्पांसाठी जाते.या घरातली माझी पहिली वटपौर्णिमा आहे ती मी इकडेच साजरी करणार आहे, अरुंधतीच्या अशा बोलण्यामुळे विना रागाने निघून जाते. तर देशमुखांकडे वटपौर्णिमेची पूजा सुरु असते. कांचन आई अरुंधती आणि आशुतोषची वाट बघत असते, तितक्यात अनिश देशमुखांकडे येतो.आणि कांचन आई अरुंधतीबद्दल त्याला विचारते, त्यावर अनिश अरुंधती येणार नसल्याचं सांगतो हे ऐकून कांचन आई नाराज होते.घरचे सर्वच तिला समजवतात.
हे देखील वाचा : भावंडांना ऐअरपोर्ट वर बघून पूजा सावंतला अश्रू अनावर
तर पुढील भागात संजनाचं वाढदिवस असतो, आणि शेखर तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.तर केळकरांकडे अनिरुद्ध वीणाला घरी सोडायला येतो.आणि विना घरी उशिरा येते म्हणून आशुतोष तिच्यावर चिडतो.आता संजना आणि शेखर पुन्हा एकत्र येतील का असा प्रश्न निर्माण होतो आहे.(Sanjana Anirudh Relation)
