प्रदीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे आई कुठे काय करते. दिवसेंदिवस मालिका प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरताना दिसते. मालिकेची कथा देखील प्रेक्षकांच्या परीक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. मालिकेत सध्या अरुंधती प्रदेशात गेली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंबा मध्ये मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी आई आणि आप्पांवर आहे.(Aai Kuthe Kay Karte Update)
एकीकडे मालिकेच्या प्रोमोत यश मागील काही दिवसांपासून गौरीच्या आठवणीत भावुक झालेला पाहायला मिळाला. तर यश ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. पण त्यातून वाचून तो घरी परतल्याच देखील दाखवण्यात आलं आहे. यश हॉस्पिटलमध्ये असतानां इशा भावुक झालेली पाहायला मिळाली तर घरी आप्पाना चक्कर देखील आल्याचं दाखवलं आहे.

तर मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये यश घरी आला पण नवीनच संकट देशमुख कुटुंबावर आल्याचं दिसतंय. देशमुखांच्या घरी पोलीस येणार असून ते यश ला अटक करण्यासाठी येतात. यश ला पोलिसांच्या तावडीतून अशितोष सुखरूप घेऊन येतो तेव्हा आप त्याचे आभार मानून तुम्ही देखील मुलांना पाल्या सारखे आहेत असं म्हणतात. तेव्हा अनिरुद्धला या गोष्टीचा राग आलाच त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत.
अरुंधती परदेशात गेल्यावर देशमुख कुटुंबावर आलेली संकट तिला समजल्यावर तिच्या काय भावना असणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दिसत आहेत.