शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नव्या घरात रुपाली भोसलेने बनवला ‘हा’ पहिला पदार्थ, स्वयंपाकघरही आहे इतकं सुंदर, व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 29, 2024 | 2:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rupali Bhosale Kitchen home video

रुपाली भोसलेचं नवं घर पाहिलंत का?, स्वयंपाकघरही आहे सुंदर

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देताना दिसतात. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तसेच मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाचाही खूप मोठा चाहता वर्ग आहे. या मालिकेतून खलनायकी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री रुपाली भोसले हिने तिच्या ग्रे शेडने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. रुपालीची संजना ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या मालिकेमुळे रुपालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर रूपाली नेहमीच सक्रिय असते. (Rupali Bhosale Kitchen)

नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच काही दिवसांपूर्वी रुपालीने तिचं नवं आणि हक्काचं घर मुंबईत घेतलं असल्याचं समोर आलं. सुंदर असा व्हिडीओ शेअर करत तिने याबाबतची माहिती चाहत्यांसह शेअर केली. अगदी लहानपणापासून स्वतःच हक्काचे घर घेण्याचे स्वप्न तिचं पूर्ण झालंय. तिच्या घराच्या गृहप्रवेशाचा गणेशोत्सवादरम्यानचे घरातील अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान वायरल झालेले पाहायला मिळाले. आता या पाठोपाठ रुपालीने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांच लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : प्रीतमला त्याचा चांगुलपणा नडला, सत्य सांगताच आबासाहेबांनी घराबाहेर काढलं अन्…; अहिल्यादेवींचाही केला अपमान

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

रुपालीने शेअर केलेला हा व्हिडीओ तिच्या स्वयंपाक घरातील आहे. नव्या घरातील नव्या स्वयंपाक घरात रुपालीने पहिल्या बनवलेल्या पदार्थाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे. यावेळी रुपाली सुंदर असा साजूक तुपातील प्रसादाचा शिरा बनवताना दिसत आहे. अगदी मराठमोळ्या पारंपरिक वेशात रुपालीने स्वयंपाक घरात जात मराठमोळा असा खास पदार्थ बनवला असल्याचे दिसतेय. यावेळी रुपालीच्या सुंदर आणि टापटीप अशा स्वयंपाक घराची ही झलक पाहायला मिळाली. मॉड्युलर किचन असलेल्या या स्वयंपाक घराने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरजला टोचून बोलणं अंकिताला पडलं महागात, निक्कीला भांडण लावण्यासाठी मिळाला विषय, नक्की चूक कोणाची?

“परमेश्वराचे, आईवडीलांचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्सच्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेतबरोबर प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद”, असं म्हणत सोशल मीडियावरुन तिने नव्या घराची झलक काही महिन्यांपूर्वी शेअरही केली होती.

Tags: marathi actressrupali bhosaleRupali Bhosale Kitchen
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Khatron Ke Khiladi Season 14 Winner

ग्रँड फिनाले आधीच 'खतरों के खिलाडी १४' चा विजेता घोषित, 'या' स्पर्धकाने पटकावली ट्रॉफी, फोटो-व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.