रोहित शेट्टीचा सर्वाधिक चर्चेत असणारा शो म्हणजे ‘खतरों के खिलाडी 14′. गेली अनेक वर्ष या शोची अनेक पर्व सुरु आहेत. आणि प्रत्येक पर्वाने नेहमीच स्वतःची अशी खासियत दाखवून दिली आहे. यंदा खतरों के खिलाडी १४’ हे पर्व जोरदार गाजलं. यानंतर आता या पर्वाचा शेवट जवळ आहे. लवकरच ‘खतरों के खिलाडी १४’ अखेर संपत आहे. त्याचा शेवटचा भाग २९ सप्टेंबरच्या रात्री प्रसारित करण्यात येईल. या दिवशी महाअंतिम सोहळा असेल आणि त्यात विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. पण त्याआधीच विजेत्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले असल्याचं समोर आलं आहे. (Khatron Ke Khiladi Season 14 Winner)
करण वीर मेहरा ‘खतरों के खिलाडी 14’ चा विजेता ठरला आहे. त्याचा ट्रॉफीसह फोटोही समोर आला आहे. शोच्या ग्रँड फिनालेनंतर करण वीर मेहराने मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याने या शोमधील त्याच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. तेथे त्याने अस्वलाच्या आकारात असलेली ट्रॉफीही सर्वांना दाखवली. करण म्हणाला की, “सर्वजण तयारी करुन आले होते. सर्वजण ट्रॉफी घेण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांची तयारी पाहून तो थोडा घाबरला. पण शेवटी त्याचा विजय झाला”.
यावेळी करण वीरने असेही सांगितले की, “ट्रॉफी हातात घेताच त्याने आपले सर्व केस काढून टक्कल करावे ही त्याची इच्छाही पूर्ण केली. असीम रियाझबद्दल तो म्हणाला की, जर तो तिथे असता तर तो जिंकू शकला असता पण त्याने आपल्या मूर्खपणामुळे सर्व काही बिघडवले. करण वीर मेहरा व्यतिरिक्त कृष्णा श्रॉफ, शालीन भानोत, गश्मीर महाजनी आणि अभिषेक कुमार यांचा टॉप 5 मध्ये समावेश होता. पण ट्रॉफी करणच्या नशिबात होती, जी त्याला मिळाली.
आणखी वाचा – नव्या घरात रुपाली भोसलेने बनवला ‘हा’ पहिला पदार्थ, स्वयंपाकघरही आहे इतकं सुंदर, व्हिडीओ समोर
खतरों के खिलाडी १४’च्या ट्रॉफीसह त्याने आलिशान गाडी व रोख बक्षीसही जिंकले. करण वीर मेहरा आता सलमान खानच्या रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’ मध्ये दिसणार आहे. अहवालात अभिनेत्याच्या नावाची पुष्टी कऱण्यात आली आहे परंतु अभिनेता अद्याप याबाबत अद्याप काहीही बोललेला नाही.