शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर पत्नीसह मालदीवला पोहोचला ‘आई कुठे…’ फेम अभिनेता, परदेशात हनिमून करत आहे एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 7, 2025 | 4:40 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Niranjan Kulkarni Maldives Trip

लग्नानंतर पत्नीसह मालदीवला पोहोचला 'आई कुठे…' फेम अभिनेता, परदेशात हनिमून करत आहे एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर

Niranjan Kulkarni Maldives Trip : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मालिकेतला प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच मालिकेमधील अभिषेक देशमुख म्हणजेच अरूंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता निरंजन कुलकर्णी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच सोशल मीडियावर अपडेटेड असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. निरंजन कुलकर्णीने या जून महिन्यात लग्न केल्याचं सोशल मीडियाद्वारे सांगितलं.

सोशल मीडियावर डेस्टीनेशन वेडिंगचे थेट फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला. ज्यामुळे आता अभिनेता त्याच्या मालदिव ट्रीपमुळे सध्या चर्चेत आला आहे. लग्नानंतर निरंजन कुलकर्णी त्याच्या पत्नीसह मालदीव येथे फिरायला गेला आहे. ट्रीपचा एक सुंदर व्हिडीओ अभिनेत्याने चाहत्यांसह शेअर केला. शिवाय स्टोरी पोस्ट करतही त्याने मालदीवचे अपडेट दिले आहेत. अभिनेत्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वॉटर विल्हा आणि निळाशार समुद्र याची झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – गरोदर राहत नव्हती म्हणून मैत्रिणी, कुटुंबानेच डिवचलं, बेबी शॉवरलाही बोलवायचे नाहीत अन्…; माही विजने सांगितला वाईट काळ

View this post on Instagram

A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)

निरंजनने हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “लग्नाआधी आणि लग्नानंतर आमचा प्रवास सुखद आहे. आमची मालदिवची ट्रीप खूपच कमाल झाली”. अभिनेत्याने पत्नीसह फोटोशूट केल्याचं ही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. निरंजनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कलाकार मंडळींसह अनेक चाहतेही या व्हिडीओला पसंती दर्शविताना दिसत आहेत.

आणखी वाचा – करीना कपूरचा PRADA ला टोमणा, कोल्हापुरी चप्पल पायात घालत फोटोही केला शेअर, म्हणाली…

निरंजनने अगदी राजेशाही थाटामाटात हा विवाहसोहळा उरकला. निरंजनच्या पत्नीचं नाव मनीषा गुरम असे आहे. मनीषा ही न्यूट्रिशनिस्ट व लाइफस्टाइल एक्स्पर्ट म्हणून काम पाहते असं तिच्या बायोमध्ये मेन्शन करण्यात आले आहे. योग दिवसाच्या दिवशीही निरंजन त्याच्या पत्नीबरोबर योग करताना दिसला, याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.

Tags: entertainmentmarathi actorniranjan kulkarni
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
riteish deshmukh preity zinta viral video

“माझ्यासाठी अशा गोष्टी तुच्छ”, रितेश देशमुख-प्रीती जिंटाच्या व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच बोलली जिनिलीया देशमुख, नक्की काय घडलेलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.