Milind Gawali Emotional : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने पाच वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेचा निरोप घेतल्यापासून प्रेक्षकवर्ग या मालिकेला मिस करताना दिसत आहेत. गेली पाच वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात ही मालिका अग्रस्थानी होती. मात्र, मालिकेच्या कथानकाने आता प्रेक्षकांचा निरोप घेतलेला पाहायला मिळतोय. असं असलं तरी मालिका संपणार हे कळालं त्यावेळेला मालिकेतील कलाकार अनेकदा सोशल मीडियाद्वारे भावुक होताना पाहायला मिळाले. यानंतर आता मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
‘होऊ दे धिंगाणा ३’ या मंचावर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. एकत्र येत धमाल-मस्ती करत या कलाकारांनी हा मंच गाजवलेला दिसला. मात्र, याच वेळी काही कलाकार आठवणींना घेऊन भावुक झालेले पाहायला मिळाले. सध्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा एक प्रोमो सोशल मीडियावर तुफान वायरल होताना पाहायला मिळतोय. यांत प्रमुख भूमिकेतील मिलिंद गवळी व मधुराणी प्रभुलकर हे दोन्ही कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले. प्रेक्षकांनीही थेट कलाकारांशी संवाद साधलेला व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – अखेर धनुष व ऐश्वर्या रजनीकांत विभक्त, लग्नाच्या १८ वर्षांनी घेतला घटस्फोट
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सिद्धार्थ जाधव म्हणतो ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. यावेळी एका महिला प्रेक्षकाने या मालिकेविषयीच्या भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “आई कुठे ही मालिका गेली पाच वर्षे आम्ही सातत्याने बघतोय”. प्रेक्षकांनी भावना व्यक्त केल्यानंतर मालिकेतील कलाकार भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी मधुराणी महिला चाहतीला थँक्यू म्हणताना दिसत आहे. यावेळी तिच्या डोळ्यात अश्रूही पाहायला मिळाले.
तर मिलिंद गवळीसुद्धा त्यांच्या भावना व्यक्त करताना भावुक झाले. यावेळी ते असं म्हणताना दिसले की, “खूप वर्षे या क्षणासाठी प्रामाणिक काम करत होतो, हे क्षण बघायला आई नाहीये”. त्यांच्या या बोलण्यानंतर त्यांच्यासह मंचावरील सर्व कलाकार भावुक झाल्याचे दिसले.