मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात सहकुटुंब गृहप्रवेश, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझ्या माणसांमुळे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 23, 2024 | 10:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ashvini Mahangade New Home

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा नव्या घरात सहकुटुंब गृहप्रवेश, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, म्हणाली, “माझ्या माणसांमुळे…”

कलाकार मंडळी नवनवीन गाड्या, घर घेत त्यांचा आनंद नेहमीच चाहत्यांसह शेअर करतात. कलाकारांचा हा खासगी आनंद चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी ते सोशल मीडियावरुन पोस्टही करतात. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने तिच्या घराच्या गृह्प्रवेशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. (Ashvini Mahangade New Home)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अश्विनीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. जानेवारी महिन्यात अश्विनीने तिच्या नव्या घराच्या चावीचा एक फोटो सोशल मीडियावरुन पोस्ट करत नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या नव्या घराची झलकही दाखविली. मुंबईत घर घेण्याचं अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण झालं. या स्वप्नपूर्ती झालेल्या घरात आता अभिनेत्रीने गृहप्रवेश केला आहे.

आणखी वाचा – “भारत सोडून जायला आम्ही इंग्रज नाही”, मुलाच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकरची पत्नी भडकली, म्हणाली, “हा निर्णय घेण्याचा…”

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अभिनेत्रीने तिच्या मुंबईच्या नव्या गृह्प्रवेशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यांत तिने सहकुटुंब गृहप्रवेश केला आहे. यावेळी अश्विनीच्या घरातील सगळे कुटुंबीय व तिचा होणारा नवराही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने या व्हिडीओला “आमच्या सगळ्यांचं घर…माझ्या माणसांमुळे या घराला घरपण आहे”, असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – गौतमी देशपांडेचा चिन्मय मांडलेकरला पाठिंबा, अभिनेत्री नेटकऱ्यांवर भडकली, म्हणाली, “लोकांची लायकी नाही…”

अश्विनीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसह काही कलाकार मंडळींनीही तिच्या नव्या घरासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये गृह्प्रवेशाची पूजा पाहायला मिळाली. यावेळी अश्विनीच संपूर्ण कुटुंब या कार्यक्रमात सहभागी झालं होतं. दरम्यान अभिनेत्रीच्या नव्या घराची झलकही यावेळी पाहायला मिळाली. अश्विनी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. अभिनयाव्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्यांमध्ये ती सक्रिय असते. सोशल मीडियावरही अभिनेत्री बऱ्यापैकी सक्रिय असते.

Tags: ashivini mahangade houseashvini mahangadeAshvini Mahangade New Homemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame Arun Kadam shared video of donating food to needy people outside Tata Hospital

अन्नदानातून समाजसेवा! अरुण कदम यांनी टाटा हॉस्पिटल बाहेरील गरजूंसाठी केली जेवणाची सोय, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.