कोणत्याही कलाकाराच्या एखाद्या चित्रपटातील, मालिकेतील भूमिकेवरून त्याच्या कलेची तुलना करणं हे चुकीचं असत कारण एखादा कलाकार हा कोणत्याही एकाच साचात बनलेला नसतो. अभिनय, दिगदर्शन, लेखन कोणत्याही भागात काम करणारा अभिनेता हा सर्वांगी असू शकतो. एखाद्या कलाकाराला आपण बराच वेळ एका भूमिकेत पाहल्यानंतर त्या कलाकाराच्या इतर गुणांकडे प्रेक्षकांचा कानाडोळा होतो पण बहुगुणी कलाकार कधीही एका ठिकाणी खिळून न राहता आपली दुसरी कला विकसित करत असतो.(New marathi movie)
असाच एक अभिनेता आपल्या मराठी मालिकाविश्वात देखील आहे. आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार अभिषेक देशमुख म्हणजेच अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा यश हा लवकरच मोठ्या पडद्यावर आगमन करत आहे पण मोठ्या पडद्यावर येताना तो लेखकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतोय थोडक्यात काय तर त्याने लिहिलेली एका चित्रपटाची कथा लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – अरुंधती, संजना आणि आता अनिरुद्धच्या आयुष्यात नव्या स्त्रीची होणार एन्ट्री?आई कुठे काय करते मालिकेत येणार नवीन वळण!

या संदर्भात एक पोस्ट करत त्याने फोटो शेअर केला आहे. My First Film as a Writer..! असं कॅप्शन देत त्याने दिगदर्शक आणि कॅमरामन यांच्या सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. अभिषेक ने पोस्ट केलेल्या या फोटो वर अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि अन्य कलाकारांनी देखील कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.(New marathi movie)