शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आळंदी-देहू पोहोचताच वारकऱ्यांनी सेल्फीसाठी घेरलं, आदेश बांदेकरांनी दिलेली वागणूक पाहून सगळेच भारावले, अन्नदानही केलं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 2:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aadesh Bandekar shared a video of having darshan of Dnyaneshwar Mauli in Alandi and Sant Tukaram Maharaj in Dehu and donating food.

Video : आळंदी-देहू पोहोचताच वारकऱ्यांनी सेल्फीसाठी घेरलं, आदेश बांदेकरांनी दिलेली वागणूक पाहून सगळेच भारावले, अन्नदानही केलं अन्...

आषाढ माहिना लागला की सर्वांना वेध लागते वारीची. संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी ही परंपरा जाणून महाराष्ट्रातील एक आकर्षणच आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी वारी करण्याचा अनुभव हा अदभूतच असतो. ज्ञानोबा, तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. त्यामुळे पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकऱ्याचे डोळे आसुसलेले असतात. सामान्य वारकऱ्यांसह अनेक कलाकारही या पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला. अशातच होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकरांनी देहू व आळंदी येथे दर्शन घेतले.

छोट्या पडद्यावरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोमधून “दार उघड बये दार उघड” असं म्हणत आदेश बांदेकर हे अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आहेत. रंगभूमी, होम मिनिस्टर आणि याशिवाय अनेक राजकीय कार्यक्रम यानिमित्ताने आदेश यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी ते प्रवास करत असतात. यादरम्यान त्यांना येणारे अनुभव, किस्से, काही खास आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे देहू व आळंदी येथील दर्शनाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aadesh Bandekar (@aadesh_bandekar)

या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर देहुमध्ये दर्शनासाठी गेले असताना अनेक चाहत्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली. यावेळी अनेक चाहते मंडळी त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी औद्धे येत होते आणि त्यांनी प्रत्येक चाहत्याला सेल्फी फोटो दिला. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत आहे. यावेळी गाभाऱ्यात त्यांनी विठूरायाच्या चरणी आपली सेवा अर्पण केली आहे. यावेळी त्यांनी विठूरायाचरणी नतमस्तक होत त्यांचे आशीर्वादही घेतले.

आणखी वाचा – Video : लीला-एजेचा रोमँटिक अंदाज, लग्नाच्या रिसेप्शनमधील दोघांच्या लूकने वेधलं लक्ष, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं अधिक लक्ष

आळंदीमधील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी देहू येथील तुकाराम महाराजांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी पोहोचले. यावेळी दर्शन घेतल्यानंतर ते भजनामध्येही देहभान हरपून गेले. त्यानंतर आदेश बांदेकरांनी देहू येथे अन्नदान सेवाही केली, मंदिरातील उपस्थित भाविकांसाठी त्यांनी अन्नदान केलं. आदेश बांदेकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओला त्यांच्या अनेक चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

आदेश बांदेकरांनी या व्हिडीओखाली “आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊलींचे आणि देहू येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन” असं लिहीत हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान, आदेश बांदेकरांच्या या व्हिडीओखाली त्यांच्या अनेक चाहत्यांनी  त्यांच्या या साधेपणाचे कौतुक केलं आहे.     

Tags: Aadesh Bandekarmarathi entertainment newsMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Madhuri Dixit Slammed

भारताने नाकारलेल्या पाकिस्तानी व्यक्तीबरोबरच माधुरी दीक्षित करत आहे काम, प्रेक्षकही भडकले, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.