शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१७ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्…; सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, पोस्टद्वारे दिली माहिती, लेकीसाठी मात्र कायम एकत्रच…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 6:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rahul Deshpande Separation

१७ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्…; सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, पोस्टद्वारे दिली माहिती, लेकीसाठी मात्र कायम एकत्रच…

Rahul Deshpande Separation : शास्त्रीय संगीताला लाभलेला हिरा म्हणजे गायक राहुल देशपांडे. आजवर राहुलने त्याच्या गायनाने साऱ्यांना मंत्रमुग्ध करुन सोडलं. मी वसंतराव या चित्रपटातून राहुल अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर आला. राहूल सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कधी तो शास्त्रीय गाणं सादर करत असतो तर कधी मुलगी रेणूकाबरोबर धम्माल मस्ती करताना दिसतो. राहुल व त्याची नेहा देशपांडे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. अशातच राहुल व नेहा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राहुल व नेहा हे वेगळे झाले आहेत. घटस्फोटाची बातमी त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. अर्थात या बातमीने साऱ्यांना धक्का बसला आहे.

राहुलने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “प्रिय मित्रांनो, तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासाचा तुमच्या पद्धतीने एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करु इच्छितो. मी तुमच्यापैकी काहींना ही बातमी आधीच शेअर केली आहे. १७ वर्षांच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणींनंतर, नेहा आणि मी परस्पर वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आमचे आयुष्य सुरु ठेवत आहोत. आमचे कायदेशीर वेगळेपण सप्टेंबर २०२४ मध्ये मैत्रीपूर्णपणे अंतिम झाले”.

आणखी वाचा – जुई गडकरी घेतेय ‘या’ विषयांत शिक्षण, सेटवर अभ्यास पूर्ण करताना दिसली आणि…; शिक्षण-अभिनय सांभाळताना होतेय तारांबळ

View this post on Instagram

A post shared by Rahul Deshpande (@rahuldeshpandeofficial)

पुढे त्याने म्हटलं, “मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरुन खासगीरित्या सर्वकाही होईल आणि सर्वकाही विचारपूर्वक व्यवस्थापित केले जाईल याची खात्री व्हावी म्हणून, विशेषतः आमच्या मुलीच्या, रेणुकाच्या, मनापासून आणि सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने. ती माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी नेहासोबत तिचे अतूट प्रेम, पाठिंबा आणि स्थिरतेसह सह-पालकत्व करण्यास वचनबद्ध आहे”.

आणखी वाचा – “तू अजून हवी होतीस…”, मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, “खोटे दिलासे शेवटी…”

शेवटी त्याने म्हटलं, “हे आमच्यासाठी वैयक्तिकरित्या एक नवीन अध्याय चिन्हांकित करत असले तरी, पालक म्हणून आमचे बंधन आणि एकमेकांबद्दलचा आमचा आदर मजबूत आहे. या काळात आमच्या गोपनीयतेबद्दल आणि निर्णयाबद्दल तुमच्या समजूतदारपणा आणि आदराबद्दल मी खरोखर आभारी आहे. प्रेम आणि कृतज्ञतेसह, राहुल”.

Tags: neha deshpanderahul deshpandeRahul Deshpande Separation
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Aadesh Bandekar Video

बांदेकरांच्या घरच्या गणपती आरतीत दिसली भावी सूनेची झलक, सुचित्रा बांदेकरांच्या पाठीच दिसली अन्…; आहे लोकप्रिय अभिनेत्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.