Aadesh Bandekar Video : सर्वत्र गणेशोत्सवामुळे मंगलमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांच्या घरीही गणरायाची भक्तिभावे सेवा केलेली पाहायला मिळाली. याची झलक त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे पाहायला मिळाली. अशातच बांदेकर कुटुंब यंदाच्या गणेशोत्सवात अधिक चर्चेत असलेलं पाहायला मिळालं. बांदेकर कुटुंब एकत्र येत गणेशाची भक्तिभावे सेवा करताना दिसलं. बांदेकरांच्या बाप्पाची खासियत म्हणजे त्याच्या बाप्पासमोर केली जाणारी आरती. बाप्पाची आरती ही खूप भक्तिभावे आणि नाचत गाजत केली जाते याचा सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाला.
आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आदेश यांनी त्यांच्या गणरायाची सेवा करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. शिवाय संपूर्ण कुटुंब एकत्र येत धमाल-मस्ती करतानाचे फोटोही पाहायला मिळाले आहेत. अशातच आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ गणपतीची आरती करतानाचा आहे. यावेळी संपूर्ण बांदेकर कुटुंब या आरतीत सहभागी होत तल्लीन झालेलं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – “माझी प्रकृती गंभीर आहे”, दीपिका कक्करचे वाईट हाल, ट्युमरच्या निदनानंतर शरीरात व्हायरल इन्फेक्शन
दरम्यान, या व्हिडीओमध्ये बांदेकर कुटुंबात अभिनेत्री पूजा बिरारीही दिसतेय. काही दिवसांपासून आदेश व सुचित्रा यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्या रिलेशनच्या चर्चांना उधाण आलं होतं. अद्याप सोहम-पूजा किंवा आदेश-सुचित्रा यांनी या नात्याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पण या चर्चा खऱ्या आहेत की नाही हा प्रश्न पडला असतानाच पूजा बांदेकरांच्या घरी गणेशोत्सवाला उपस्थित होती. त्यामुळे अर्थात ही केवळ चर्चा नसून ही सत्य बाजू असल्याचं समोर आलं.
आदेश यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आरतीच्यावेळी सुचित्रा यांच्या बरोबर पाठीमागे पूजा उभी आहे. बांदेकरांच्या घरात होणारी आरती पाहून ती काहीशी थक्क झाली, मात्र तिच्या चेहऱ्यावर आनंदही दिसला. तीदेखील या सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाली असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता पूजा व सोहम त्यांच्या रिलेशनची बातमी केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





