शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचं शिक्षण किती?, प्रश्न विचारताच म्हणाली, “मीडियाशी संबंधित…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tharala tar mag fame Marathi actress Jui Gadkari talks about her education and also says that she is the topper of Mumbai University 2009 batch.

‘ठरलं तर मग’ फेम सायलीचं शिक्षण माहितीये का? मुंबई विद्यापीठाची होती टॉपर, जाणून घ्या...

‘ठरलं तर मग’ मालिकेतल्या साध्या, सोज्वळ सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने गेल्या काही वर्षांत आपल्या अभिनयाने प्रत्येकाचं मन जिंकलं आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जुईची ‘ठरलं तर मग’ मालिका टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा अग्रस्थानी आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरची लाडकी सून म्हणून तिला घराघरांत ओळखलं जातं. मालिकाविश्व गाजवणारी जुई ही सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर जुई अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. तसंच नवीन प्रोजेक्टबाबतही ती चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते.  (jui gadkari education)

सेटवरची धमाल, ‘ठरलं तर मग’ मालिकेचे प्रोमो जुई आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. नवीन वर्षानिमित्त जुईने चंहत्यांशी संवाद साधला. नुकतंच इन्स्टाग्रामवर तिने ‘आस्क मी सेशन’ घेऊन चाहत्यांशी गप्पा मारल्या. यावेळी जुईच्या अनेक चाहत्यांनी जुईला तिच्या संबंधित काही प्रश्न विचारले. अभिनेत्रीला एका चाहत्याने तिच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना जुईने तिने कोणत्या विषयात पदवी संपादन केलीये याचा खुलासा केला.

आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?

यावेळी नेटकऱ्याने जुईला “तुम्ही बीएमएम केलं आहे का? त्याचे काही फायदे आहेत का?” असा प्रश्न विचारला. यावर तिने असं उत्तर दिलं की, “होय! मी मुंबई विद्यापीठ २००९ च्या बॅचची टॉपर आहे! बी.ए.एम. (जाहिरात)मध्ये मी बी.एम.एम. केलं आहे. हा एक पदवी अभ्यासक्रम आहे. जर तुम्हाला ते सामान्य जीवन आवडत नसेल, तर फक्त बी.एम.एम. कोर्समध्ये जा. मग तुम्ही खरे स्वप्न जगण्यास सुरुवात कराल! हा कोर्स तुम्हाला मीडियाशी अतिशय व्यावहारिक ज्ञान देतं. मी या कोर्स डिझाइनच्या प्रेमात आहे”.

आणखी वाचा – “हार मानलेली असताना…”, नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान अंकिता वालावलरकची नवऱ्यासाठी खास पोस्ट, म्हणाली, “हा माणूस मला…”

दरम्यान, ‘पुढचं पाऊल’ नंतर जुई अनेक मालिकांमध्ये दिसली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘वर्तुळ’, ‘सरस्वती’ या मालिकांमध्ये ती झळकली. ‘बिग बॉस मराठी’मध्येही जुई सहभागी झाली होती. त्यामुळे आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकणारी जुई गडकरी आता मोठ्या पडद्यावर चित्रपटांमधून कधी पाहायला मिळणार? याची चाहते वाट पाहत आहेत.   

Tags: jui gadkarijui gadkari educationTharala tar mag fame Marathi actress Jui Gadkari
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Sajid Khan Break Silence

"अनेकदा आत्महत्येचा विचार केला तेव्हा…", साजिद खानची अशी आहे परिस्थिती, म्हणाला, "घर विकलं, भाड्याने राहिलो तरीही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.