शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लक्ष्मी निवास’ फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर शेअर केली लग्नपत्रिका, कधी करणार लग्न?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 2, 2025 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lakshmi Niwas serial fame actress Divya Pugavkar is going to get married soon and she shared the wedding card on social media

'लक्ष्मी निवास' मालिका फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर लग्नपत्रिका व्हायरल

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर. या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिनं आपलं एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत तिने मुक मुलीची भूमिका साकारली होती आणि तिच्या या अभिनयला सर्वांनी डोक्यावर घेतलं. नुकतीच ती झी मराठीवरील नवीन मालिका लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे तिच्या लग्नाची. अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. (divya pugaonkar get married soon)

दिव्यामे तिच्या सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिकेची एक छोटीशी झलक शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. २०२५ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत दिव्याने लवकरच लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं आहे. “नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभराचे प्रेम. लवकरच होत आहे’ असं म्हणत तिने तिची लग्नपत्रिका शेअर केली आहे. दिव्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर ‘अक्षय आणि दिव्या Save The Date’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या पोस्टखाली तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने यामध्ये कुठेही तिच्या लग्नाच्या तारखेचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे कमेंट्समध्ये कलाकारांसह चाहत्यांनीसुद्धा दिव्याला ‘तारीख सांग’ अशी विचारणा केली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Divya Pugaonkar (@divyasubhashpugaonkar_official)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध ‘आशिकी’ चित्रपटातील अभिनेत्रीचा विचित्र डान्स पाहून चाहते संतापले, प्रतिक्रिया देत म्हणाले, “किती फालतू…”

अभिषेक रहाळकरने या पोस्टखाली “आमची उपस्थिती हाच आमचा आहेर” अशी कमेंट केली आहे. तर सिद्धार्थ खिरीडने “तारीख तर सांग” अशी कमेंट केली आहे. यावर अभिनेत्रीने त्याला “कॉल वर सांगते” असं उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता अनेकांना अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. १९ डिसेंबर २०२१ रोजी दिव्याचा तिलक समारंभ पार पडला होता. यानंतर तिला अनेकदा लग्नाबद्दल विचारणा केली जायची. अशातच आता तिने लग्नाची माहिती दिली आहे. तिने तारीख जाहीर केली नसली तरी लवकरच ती लग्नबंधनात अडकणार आहे असं वाटत आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा ‘कार’नामा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घेतली महागडी आलिशान कार, फोटो व्हायरल

दरम्यान, दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे. तर दिव्याने मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांत काम केलं आहे. तर आता ती लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत ती श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची व्यक्तिरेखा अभिनेत्री साकारत आहे.

Tags: divya pugaonkar divya subhash pugaonkardivya pugaonkar get married soondivya pugavkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Siddharth Chandekar And Mitali Mayekar

ऑनस्क्रीनही प्रेमाचा गोडवा! सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरचा पहिलाच एकत्रित चित्रपट, पोस्टद्वारे मोठी घोषणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.