शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनानंतर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “अचानक निघून गेलास आणि…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 27, 2024 | 9:12 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
prarthna behere brother passed away

भावाच्या निधनानंतर प्रार्थनाची भावुक पोस्ट

मराठी मनोरंजनक्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहेरेचं नाव घेतलं जातं. आजवर प्रार्थना अनेक मालिका तसेच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचीदेखील खूप पसंती मिळते. मात्र सध्या प्रार्थनावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रार्थनाच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिची एक भावनिक पोस्ट समोर आली आहे. यामध्ये तिच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती म्हणजे तिचा भाऊ. प्रार्थनाची ही भावुक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (prarthna behere brother passed away)

प्रार्थनाने भावाच्या निधनानंतर भावाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “लव्ह यू पिंटू. तुझी नेहमी आठवण येत राहील. तू असा अचानक निघून गेलास. आपण एकमेकांना व्यवस्थित बायदेखील म्हणालो नाही. पण भाऊ कधीही लांब जात नाही. आपल्या चांगल्या आठवणी नेहमी स्मरणात राहतील. तुझ्या आत्म्यास शांती मिळो. आपण पुढच्या जन्मात एकमेकांना भेटू” असं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

आणखी वाचा – अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हटवला?, नक्की काय आहे यामागील सत्य? जाणून घ्या

View this post on Instagram

A post shared by Prarthana Behere Jawkar 💜 (@prarthana.behere)

प्रार्थनाच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला असून तिला खंबीर राहण्यास सांगितले आहे. प्रार्थनाची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.प्रार्थनाने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हाट्सॲप लग्न’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना आपलसं केलं. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

आणखी वाचा – अखेर प्रतीक्षा संपली! शाळेच्या शेवटच्या वर्षाच्या आठवणीत रमवणारा ‘दहावी-अ’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

मात्र, लग्नानंतर प्रार्थना चित्रपटांमध्ये फारशी दिसली नाही. पुढे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमधून तिने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. मात्र, चाहते व प्रेक्षक तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रचंड आतुरलेले आहेत. आता ती कोणत्या चित्रपटात दिसून येणार आहे? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Tags: brother deathbrother sisterprarthna behere
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
kaumudi walokar new look

Video : ना भरजरी साडी, ना महागडे दागिने, 'आई कुठे…' फेम अभिनेत्रीचा लग्नासाठी साधाच लूक, मंगळसूत्राच्या डिझाइनची रंगली चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.