रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर प्रतीक्षा संपली! शाळेच्या शेवटच्या वर्षाच्या आठवणीत रमवणारा ‘दहावी-अ’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 28, 2024 | 2:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dahavi-A Series Trailer

‘इट्स मज्जा’च्या ‘दहावी-अ’ सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘शाळा’ हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक असतो. शाळा म्हटली तर प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणीही आल्याच. त्यात दहावीचे वर्ष कायमच सर्वांसाठी खास असते. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास व संस्मरणीय आठवणींची शिदोरी घेऊन प्रत्येकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. अशीच शालेचं आणि शाळेतील आठवणींचं भावविश्व उलगडून दाखवणारी ‘मीडिया वन सोल्युशन्स’ प्रस्तुत, ‘कोरी पाटी’ प्रॉडक्शन व ‘इट्स मज्जा’ ओरिजिनल एक सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत आणि या सीरिजचं नाव आहे ‘दहावी-अ’. ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘इट्स मज्जा’ प्रेक्षकांसाठी ‘दहावी-अ’ ही सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Dahavi-A Series Trailer)

‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी व हवीहवीशी वाटणारी गोष्ट प्रेक्षकांनाही तितकीच भावली होती. पण २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्रीचा फिल्मी स्टाईल संगीत सोहळा, जबरदस्त डान्स, धमाल अन्…; Photo viral

‘आठवी-अ’ या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ही सीरिज कधी सुरु होणार? याची उत्सुकता लागून राहिली होती आणि आता त्यांची ही उत्सुकता अखेर संपणार आहे. नुकताच ‘इट्स मज्जा’च्या ‘दहावी-अ’ या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज २६ डिसेंबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘दहावी-अ’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला.

आणखी वाचा – “डोक्यावरचं आभाळ फाटलं, पायाखालची जमीन निसटली अन्…”, वडिलांच्या आठवणीत ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट, म्हणाले, “गेली १९ वर्ष सतत…”

‘दहावी-अ’ मध्येही ‘आठवी-अ’मधील अथर्व अधाटे, सृष्टी दणाने, ओम पाणस्कर, श्रेयश कटके, सत्यजित होमकर, रुद्र इनामदार व संयोगिता चौधरी हे कलाकार आहेत. तसंच काही इतर कलाकारही असणार आहेत. दरम्यान, ‘दहावी-अ’साठी प्रसिद्ध फुड ब्रँड पालेकर व द परफ्युम हाऊस यांचे सहकार्य लाभले आहे. येत्या ६ जानेवारी पासून सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Tags: Dahavi-A Series TrailerItsmajja Dahavi-A SeriesItsmajja Original Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
2024 in the year aai kuthe kay karte fame Rupali Bhosle, Madhurani Prabhulkar, Ashwini Mahangde, Amruta Khanvilkar, Aishwarya and Avinash Narkar bought a new house.

आलिशान जागा, आकर्षक इंटेरियर ते सुंदर सजावट; २०२४मध्ये या मराठी कलाकरांनी उभारलं स्वतःचं हक्काचं घर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.