२०२४ हे वर्ष मराठीतील अनेक कलाकारांसाठी लाभदायी ठरले. २०२४ या वर्षात कुणी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली तर कुणाच्या घरात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. तसंच २०२४ या वर्षात कुणी नवीन गाडी घेतली तर, कुणी नवीन घरही घेतलं. मावळत्या वर्षाला निरोप देताना अनेकजण आपल्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटना, प्रसंगे यांची उजळणी करत असतात. अशीच काही मराठी कलाकारांची उजळणी आपण करणार आहोत. तर जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार ज्यांची यंदाच्या वर्षी नवीन घर घेण्याची स्वप्नपूर्ती झाली. (Marathi Artist New Home)
- मधुराणी प्रभूलकर : २०२४ या वर्षात अभिनेत्री ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभूलकरने नवीन घर घेतलं. मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी तिने हे नवं घर घेतलं असून याचा खास व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मधुराणी गेल्या काही वर्षांपासून पुणे-मुंबई-ठाणे असा प्रवास करत होती. आता ती मुंबईकर झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
- ऐश्वर्या-अविनाश नारकर : २०२४ या वर्षात दिवाळीच्या मुहूर्तावर अभिनेत्री ऐश्वर्या व अभिनेते अविनाश नारकर यांनी नवीन घर घेतलं. नव्या फ्लॅटची झलक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. “आनंदाचा नवीन रस्ता. आमचं नवीन घर”, असं कॅप्शन देत त्यांनी नव्या घराबाबत अपडेट दिली होती.
- अमृता खानविलकर : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतंच मुंबईत नवीन घर घेतलं आहे. ऐन दिवाळीत अमृताची स्वप्नपूर्ती झाली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
- शिवाली परब : महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरांत पोहोचलेली कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब. काही दिवसांपूर्वीच शिवालीने मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी केलं. या नवीन घरात अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गृहप्रवेश केला.
- रोहित माने : महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या अभिनेता रोहित माने याने मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. जानेवारी महिन्यात रोहितची नवीन घराची स्वप्नपुर्ती झाली.
- अश्विनी महांगडे : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अश्विनी महांगडेनेसुद्धा यंदाच्या वर्षात नवीन घर घेतलं. श्विनीची जवळची मैत्रीण माधुरी पोळ हिने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. त्या स्टोरीमध्ये माधुरीने अश्विनीचा एका फोटो शेअर करत तिचं नव्या घरासाठी अभिनंदन केलं होतं.