रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बेंचवर पेपर टाकून झोपलो, हॉटेलच्या बाथरुममध्ये कपडे बदलले अन्…”, सेटवर मिळालेल्या वागणुकीवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे भाष्य, म्हणाला, “व्हॅनिटी फक्त…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 21, 2024 | 9:50 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
विवेक ऑबेरॉयने 'साथिया' चित्रपटावेळी घडलेली घटना सांगितली

विवेक ओबेरॉयने सांगितला 'साथिया' चित्रपटाच्यावेळचा किस्सा

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने कोट्यावधी रुपयांची अलिशान कार खरेदी केली होती. कारची पूजा करतानाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. यामुळे विवेकचे मोठ्या प्रमाणात कौतुकदेखील झाले होते. विवेकने २००२ साली मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता, अभिनेत्री राणी मुखर्जीबरोबर तो या चित्रपटामध्ये दिसून आला होता. विवेक व राणी यांच्या जोडीला अधिक पसंती मिळाली होती. अशातच आता विवेकने या चित्रपटाबद्दल काही खुलासे केले आहेत. या चित्रपटाच्यावेळी त्याला मिळालेली वागणूक कशी मिळाली? हे देखील सांगितले आहे. विवेक नक्की काय म्हणाला? हे आपण आता जाणून घेऊया. (vivek oberoi on saathiya)

‘साथिया’ चित्रपटाच्या वेळच्या आठवणीबद्दल विवेक म्हणाला की, “’साथिया’ एक कमी बजेटमध्ये असणारा चित्रपट होता. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन फक्त राणीला मिळायची. मी हॉटेलच्या बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलायचो. मी रस्त्यावर उभं राहून मेकअप केला आहे. मी कोण आहे? हे कोणालाही माहीत नव्हतं. मी खांद्यावर ट्रायपॉड घेऊन इतर क्रूबरोबर चालायचो”.

आणखी वाचा – शाहीद व करीना कपूरला पुन्हा एकदा एकत्र पाहून चाहत्यांना ‘जब वी मेट’ची आठवण, ‘तो’ फोटो व्हायरल होताच म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Experience Abu Dhabi (@visitabudhabi)

पुढे तो म्हणाला की, “ ‘साथिया’ चित्रपटासाठी मी सलग २२-२३ तास शूट करायचो. मी तिथेच बेंचवर पेपर टाकायचो आणि झोपायचो. एकदा आम्ही गेयटी गॅलक्सी येथील रेल्वे चॅनलच्या इथे शूट करत होतो. आम्ही शूट चालू केले. राणी प्रसिद्ध होती त्यामुळे तिच्या बरोबर एक बॉडीगार्ड असायचा. मात्र माझ्याबरोबर असं कोणी नसायचं. नंतर अचानक २००० लोक तिथे जमा झाले आणि सगळी सुरक्षा व्यर्थ ठरली”.

आणखी वाचा – लग्नाच्या नऊ वर्षांनी गुडन्यूज मिळाली पण…; तिसऱ्या महिन्यातच गर्भपात, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, “६५ इंजेक्शन्स…”

नंतर तो म्हणाला की, “खूप लोक जमा झाल्याने मी गोंधळलो. नंतर मला राणीच्या मेकअप व्हॅनमध्ये ढकललं. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. नंतर शादने दरवाजा उघडला आणि म्हणाला की हे सगळे तुझ्यासाठी आली आहेत. तू एक मोठा स्टार आहेस”. नंतर आम्ही पुढच्या रविवारी पोलिस सिक्युरिटीबरोबरच हा सीन चित्रित केला गेला”. दरम्यान विवेकची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.    

Tags: saathiyavanity vanVivek oberoi
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
21 December 2024 Horoscope daily horoscope due to the auspicious yoga of Preeti Yoga, Saturday is a special day

21 December Horoscope : प्रीती योगाच्या शुभ योगामुळे शनिवारचा दिवस ‘या’ राशीच्या लोकांसाठी खास, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.