रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी तुझीच आहे आणि…”, नवऱ्याच्या वाढदिवसाला जिनिलीया देशमुखची रोमँटिक पोस्ट, शेअर केले Unseen Photos

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 17, 2024 | 3:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Genelia Deshmukh shared a special post to wish Riteish Deshmukh on his birthday

रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त बायको जिनिलीयाचे खास पोस्ट, कौतुक करत म्हणाली...

गेल्या दोन दशकांपासून मराठी व हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारा स्टाइल आयकॉन म्हणजेच अभिनेता रितेश देशमुख. गेल्या अनेक वर्षांपासून रितेश मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. रितेशने मनोरंजन विश्वात सक्रिय असला, तरी तो पेशाने आधी आर्किटेक्ट होता. मात्र, त्याने आपल्या कारकिर्दीत वेगळा मार्ग निवडला. आजही तो आर्किटेक्ट आहे आणि स्वतःची इंटिरिअर डिझायनिंग कंपनीही चालवतो. पण, यानंतरही त्याने चित्रपटांमध्ये आपलं स्थान पटकावलं आहे. अशातच आज रितेश त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रितेश देशमुख आज बॉलिवूडमधील यशस्वी स्टार्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. (Genelia Deshmukh wish Riteish Deshmukh)

रितेशने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा चित्रपट फ्लॉप झाला, पण या चित्रपटामुळे त्याला त्याची आयुष्यभराची जीवनसाथी मिळाली. ती म्हणजे जिनिलीया डिसूझा. रितेश आणि जिनिलीया डिसूझा हे बॉलिवूडचे आदर्श जोडपे म्हणून ओळखले जातात. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात, सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. आणि त्यांच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच जिनिलीयाने लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

आणखी वाचा – …अन् घरात काम करणाऱ्या त्या मुलीचं कविता मेढेकरांनी पूर्ण केलं शालेय शिक्षण, म्हणाल्या, “सातवीमध्ये तिने शाळा सोडूनही…”

जिनिलीयाने रितेशबरोबरचा हटके फोटो शेअर केला आहे आणि या पोस्टसह तिने असं म्हटलं आहे की, “जर तुम्ही सर्वोत्तम मुलगा, सर्वोत्तम वडील, सर्वोत्तम भाऊ आणि सर्वोत्तम पती शोधत असाल तर तो माझ्याकडे आहे. प्रिय रितेश तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझी आहे आणि यात कसलाच रिफंड नाही”. या फोटोला बॉलिवूडसह अनेक मराठी कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच रितेशलाही त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – महागड्या Birthday Gift साठी संतोष जुवेकर कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला पण…; घडलं काही भलतंच, Video Viral

दरम्यान, रितेश व जिनिलीया यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ मध्ये लग्न केले. रितेश आणि जेनेलिया यांना रियान आणि राहिल अशी दोन मुले आहेत. त्यांच्या या सुखी संसाराला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोघांची जोडी चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. दोघेही महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून लोकप्रिय आहेत.

Tags: Genelia Deshmukh wish Riteish DeshmukhRiteish Deshmukh and Genelia DeshmukhRiteish Deshmukh birthday
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar

'शिवा' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लग्नानंतरची पहिली डेट, शेअर केले रोमँटिक फोटो, लूकने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.