नागार्जुन यांचा थोरला लेक म्हणजेच अभिनेता नागा चैतन्य याने ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. अभिनेत्याने लोकप्रिय अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले असून, हे त्याचे दुसरे लग्न होते. त्यांच्या लग्नाचे अबेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. तसंच या दोघांच्या फोटोला नेटकऱ्यांकडुनही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओमुळे नागा चैतन्य व त्याची बायको शोभिता टीकेचे धनी झाले आहेत. नागा चैतन्यकडून आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Sobhita Dhulipala touched Naga Chaitanya feet)
तामिळ विवाहांमध्ये, आदर आणि प्रेमाचे चिन्ह म्हणून वधूने आपल्या पतीच्या पायांना स्पर्श करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा म्हणून शोभिताने आशीर्वाद घेण्यासाठी पती नागाच्या पायांना स्पर्श केला. नुकताच नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि यात शोभिता आणि नागा चैतन्य एकमेकांसोबत बसलेले दिसत होते. यावेळी तिने नागा चैतन्यच्या पायांना स्पर्श केला. मात्र यामुळे नेटकऱ्यांनी दोघांवर टीका केली आहे.
आणखी वाचा – झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर हळहळले मराठी कलाकार, भावुक पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख
टीका करताना एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे एक मजेदार नाटक आहे. महिला, स्त्रीवाद आणि त्या सर्वांबद्दल बोला आणि त्यांच्या पायांना स्पर्श करा”. एकाने लिहिले की, “आपण २०२४ मध्ये राहत आहोत?” तर एकाने म्हटलं आहे की, “तो तिला थांबवत नाहीय, त्याऐवजी त्याला वाटत आहे की, तो काही देव आहे आणि त्यामुळे तो तिला आशीर्वाद देत असल्यासारखे वागत आहे”. तसंच काहींनी असा युक्तिवाद केला की, “हा केवळ एक विधी आहे, पण त्याचा असा न्याय केला जाऊ नये”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन अजूनही जिवंत?, कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “उपचार सुरु आहेत आणि…”
दरम्यान, नागा चैतन्यचे शोभिताबरोबर हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याचे लग्न समंथाबरोबर झाले होते. २०१७ साली ते लग्नबंधनात अडकले होते आणि २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये घटस्फोटानंतर नैराश्य आल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता शोभिताबरोबर दुसरे लग्न करत त्याने त्याच्या दुसऱ्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.