रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : दु:खी झालेल्या लीलाला येतेय एजेंची आठवण, दोघांच्या प्रेमाला नवा बहर, नव्या प्रोमोने वेधलं लक्ष

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 10, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial update new promo sad Leela remembering AJ

नवरी मिळे हिटलरला मालिकेत नवा ट्विस्ट, लीलाला येते एजेंची आठवण

झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. एजे व लीला यांच्यामधील कुरबुरी असो किंवा लीला व तिच्या सुनांमधील छोटी-मोठी भांडणं असो, लीलाच्या वडिलांचं तिच्यावरील प्रेम असो किंवा आजीचं तिला समजावून घेणं असो; प्रेक्षकांना ही मालिका भुरळ घालते. वेगळ्या धाटणीचे कथानक आणि कलाकारांचा सहज अभिनय यांमुळे या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याबरोबरच नवरी मिळे हिटलरला या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. मालिकेत काही दिवसांपूर्वी लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराची जाबबदारी देण्यात आली आहे. (Navri Mile Hitlerla serial update)

आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून, लीलाला एजेची आठवण येत असल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लीला तिच्या सुनांना जाब विचारत आहे. लीला लक्ष्मीला म्हणते, “तू डिलिव्हरीची वाट लावलीस आणि सरस्वती तू जेवणाची. मी सांगितलेली कामं कोणीही केली नाहीत.” तिचे हे बोलणे ऐकून दुर्गा म्हणते, “आम्ही तर आमची कामं केली आहेत. पण, तुम्ही ती विचार करून वाटली असती, तर ती पूर्णसुद्धा झाली असती.” त्यानंतर दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती निघून जातात. दुर्गाचे बोलणे ऐकून लीला नाराज होते. आजी तिथेच बसून घडलेला प्रकार पाहत असल्याचे दिसते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सलमान, शाहरुखनंतर आणखी एका दाक्षिणात्य अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, सिनेविश्वात मोठी खळबळ, नेमकं प्रकरण काय?

त्या लीलाला म्हणतात, “चुका सगळ्यांच्या हातून होतात आणि चुकांमधूनच शिकायचं असतं”. प्रोमोमध्ये पुढे लीला तिच्या रूममध्ये आली असून, ती रडत आहे. रडत-रडत ती स्वत:शीच बोलताना म्हणते, “आज मी सगळी गडबड केली. एजे या ना लवकर”, तितक्यात तिला गाडीचा हॉर्न ऐकू येतो. एजे गाडीतून उतरत असल्याचे पाहायला मिळते. लीला आनंदात दरवाजा उघडते आणि एजेला मिठी मारते.

आणखी वाचा – अमोलच्या आनंदासाठी अप्पी-अर्जुन पुन्हा लग्नबंधनात अकडणार, सुपारीही फुटली, मालिकेच्या नवीन प्रोमोने वेधलं लक्ष

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “घडलेल्या प्रकारामुळे दु:खी झालेल्या लीलाला येतेय एजेंची आठवण…!” असं कॅप्शन देत हा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामुळे आता एजे व लीला यांच्या नात्यात काय बदल होणार? लीला एजेंच्या प्रेमात पडणार  का? आता एजे व लीलाच्या नवीन नात्याची सुरुवात होणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यामुळे मालिकेतील आगामी नवीन भाग पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत हे नक्की.

Tags: navri mile hitlarla latest episodenavri mile hitlarla zee marathiNavri Mile Hitlerla Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
siddharth on pushpa 2

"बिर्याणी व दारुसाठी…", अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ला होणारी गर्दी पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याची खोचक पोस्ट, म्हणाला, "आपल्या देशात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.