Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाल्यापासून मालिकेची समीकरणे बदललेली पाहायला मिळतायत. यशस्वी उद्योजिका अनुष्काचा मालिकेत प्रवेश झाला आहे आणि अनुष्काने अत्यंत चलाखीने आणि बुद्धीने किर्लोस्कर यांच्या कुटुंबात प्रवेश करत घरातील प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. ही अनुष्का दुसरी तिसरी कोणी नसून दिशाची बहीण असल्याचे समोर आले. आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अनुष्काने किर्लोस्करांच्या घरात एन्ट्री केली असल्याचे पाहायला मिळतेय. आलेल्या संकटांना तोंड देत तिने अहिल्यादेवींचे मन जिंकलं आहे.
अहिल्यादेवींनी अनुष्काची निवड किर्लोस्कर यांची मोठी सून आणि आदित्यची पत्नी म्हणून केली असल्याचं पाहायला मिळतंय. अनुष्काने देखील आदित्यच्या मनात घर केलं आहे. आई सांगेल त्याच मुलीशी मी लग्न करणार असं म्हणणाऱ्या आदित्यने अनुष्काचा बायको म्हणून स्वीकार केलेला पाहायला मिळतोय आणि यामुळेच पारूचं मन दुखावलं गेलं. सुरुवातीला पारूचा काटा काढायचा अनुष्काने ठरवलेला असतो. दिशाने देखील पारूला आधी सगळ्यात तू बाजूला कर असं बहिणीला सांगितलेलं असतं. त्यामुळे अनुष्का आता पारूच्या मागेच लागलेली असते. अनुष्का, पारू आदित्यमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करताना दिसतेय आणि याचा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये अनुष्का व पारू यांच्यात संभाषण होताना पाहायला मिळतेय. अनुष्का पारुला असं म्हणताना दिसत आहे की, ‘आपण सगळ्यांनीच आदित्यला त्याचं काम करु दिलं पाहिजे. आपण सतत त्याच्या आजूबाजूला घुटमळत राहतो. फिरत राहतो, मग मला सांग तू त्याचं काम तो कसं करणार?, पारू आता तरी आदित्यला फ्री ठेवशील ना तू?’. अनुष्काचं हे बोलणं ऐकून पारू तिला उत्तर देत म्हणते, ‘तसंही माझी खरी जागा मला कळली’.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची गिनीज बुकमध्ये नोंद होणार, निर्मात्यांनी सांगितलं कारण, म्हणाले, “लवकरच…”
‘पारू आदित्य पासून दुरावणार का’ असं कॅप्शन दे ‘झी मराठी’ने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलाय. एक प्रकारे अनुष्काने पारू व आदित्यच्या नात्यात ठिणगी टाकली असल्याचं पाहायला मिळतंय. आता पारू खरंच अनुष्कापासून दुरावणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.