शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्लास्टिकच्या हसणाऱ्या लोकांमध्ये…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा मोठा खुलासा, तर अभिषेक बच्चनला म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 6, 2024 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vivek Oberoi  On Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा मोठा खुलासा, तर अभिषेक बच्चनला म्हणाला…

Vivek Oberoi  On Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्याशी निगडीत अनेक किस्से नेहमीच कानावर येत असतात. तिचे चाहते नेहमीच तिचे कौतुक करतात आणि ती तिच्या दमदार अभिनय व सौंदर्यासाठी ओळखली जाते. ऐश्वर्याचे सलमान खान आणि विवेक ओबेरॉयबरोबर लव्ह-हेट रिलेशन होते. आता, विवेकने अनेक वर्षांनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्यावर टिप्पणी केली आहे आणि ती वाईट व विषारी नातेसंबंधातून कशी बाहेर आली हेदेखील सांगितले आहे. विवेकने ऐश्वर्याबाबत केलेलं भाष्य धक्कादायक आहे. विवेकच्या या बोलण्याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. ऐश्वर्याबाबत त्याच भाष्य चर्चेत आलं असलं तरी त्याने अभिषेक बच्चनबाबत केलेलं विधानही लक्षवेधी आहे.

विवेक ओबेरॉय डॉ. जय मदनच्या यूट्यूब चॅनेलवर आला होता. जिथे त्याने सांगितले की जर त्याला त्याच्या आयुष्याचा उद्देश माहित नसता, तर तो प्लास्टिकच्या हसणाऱ्या लोकांमध्ये प्लास्टिकचे आयुष्य जगत असता. त्याने स्वत: मध्ये, सलमान व ऐश्वर्यामधील मतभेदांची कबुली दिली आणि ‘देव त्यांचे भले करो’ असे सांगितले. त्या रिलेशनशिपमधून बाहेर पडताना विवेकने त्या जुन्या काळाबद्दल सांगितलं. विवेक म्हणाला, ‘कदाचित मी एक विचित्र माणूस झालो असतो, विचित्र आयुष्य जगलो असतो. प्लास्टिकच्या हसणाऱ्या लोकांमध्ये कदाचित मी स्वतः प्लास्टिक बनलो असतो. आता लोकांनी मला ट्रोल केले तरी मला पर्वा नाही. कारण मला आयुष्यातील माझा उद्देश माहित आहे, मला माहित आहे की माझ्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे”.

आणखी वाचा – स्वानंदी टिकेकरने दणक्यात साजरा केला वडिलांचा वाढदिवस, सेलिब्रेशनचा व्हिडीओही केला शेअर, म्हणाली, “सर्वोत्तम माणूस आणि…”

View this post on Instagram

A post shared by Vivek Oberoi (@vivekoberoi)

जेव्हा अभिनेत्याला त्याच्या पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड ऐश्वर्याच्या पती अभिषेकबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ज्युनियर बच्चनचे एक प्रिय आणि चांगला माणूस म्हणून वर्णन केले. विवेक आता व्यावसायिक जगतात एक नावाजलेले नाव बनला आहे आणि त्याने सांगितले की त्याच्या आयुष्यात एक मोठा उद्देश आहे याचा मला आनंद आहे. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून बाहेर पडल्याचा त्याला अभिमान आहे ज्याने तो उध्वस्त झाला असता. नात्याचा विचार करताना सेलिब्रिटींचे अनुभव अनेक पटींनी वाढतात हे त्यांच्या लक्षात आले.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ने रचला इतिहास, ठरला हिंदीतील ब्लॉकबस्टर चित्रपट, शाहरुख खानच्या ‘जवान’लाही टाकलं मागे

मुलाखतीत पुढे राहून विवेकने ब्रेकअपच्या मार्गाने जात असलेल्या प्रत्येकासाठी एक सुंदर सल्ला दिला. जर कोणी तुमचे आयुष्य सोडून जात असेल तर असा विचार करा की एखाद्या मुलाने त्याचा लॉलीपॉप चिखलात टाकला तर त्याची आई त्याला खाऊ देणार नाही कारण ते गलिच्छ आहे, बरोबर?, असा खुलासा केला. आयुष्य प्रत्येकाला नवीन जोडीदार देईल. वेदना जितकी जास्त काळ टिकते तितकी वेदना सहन करण्याची शक्ती वाढते.

Tags: bollywood gossipVivek Oberoi  On Aishwarya Rai Bachchanvivek oberoi statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
amitabh bachchan viral comment

इंग्रजी भाषा बोलल्याने अभिषेक बच्चन नेटकऱ्याकडून ट्रोल, लेकाची बाजू घेत अमिताभ म्हणाले, "तुमचा दृष्टिकोण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.