शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट, म्हणाला, “मला या जगात आणल्याबद्दल…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2024 | 10:57 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Swapnil Joshi shared a special video to wish her mother on her 74th birthday

आईच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीच्या आईला हटके शुभेच्छा, खास व्हिडीओ सोशल मीडियावर केला शेअर

‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’, ‘भिकारी’, ‘फुगे’ या सिनेमांमुळे स्वप्नील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. आजवर त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. येत्या काळातही स्वप्नील हटके भूमिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील जोशीच्या आईचा आज ७४वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. (Swapnil Joshi Mother Birthday)

अभिनेता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओदेखील शेअर केला आहे. रेडिओला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओत त्याने असं म्हटलं आहे की, “मी Mumma’s Boy आहे. माझ्यासाठी आई माझं जग आहे आणि ती माझी खूप चांगली मैत्रीणही आहे. मला कोणती मुलगी आवडली तर मी तिला हक्काने सांगायचो की, आई बसना तुला काही सांगायचं आहे. आई एकदम बंटाय है होती. अजूनही ती बंटाय आहे. मला वाटतं आई हे एकमेव नातं आहे, जिला एका कॉलवर कळतं की काय र बरा आहेस ना?”

View this post on Instagram

A post shared by स्वप्नील जोशी (@swwapnil_joshi)

आणखी वाचा – “महाराष्ट्राला लाभलेले गतवैभव…” नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मराठी कलाकारांच्या खास शुभेच्छा, म्हणाले, “नागरिक म्हणून…”

तर या व्हिडीओसह तिने कॅप्शनमध्येही आईला शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याने असं म्हटलं आहे की, “७४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. तुझ्या शहाणपणाने आणि प्रेमाने अप्रतिम प्रवासाला आकार दिला आहे यामुळे तुला माझे आयुष्य म्हणायचे भाग्य मिळाले! मला या जगात आणल्याबद्दल आणि माझे सर्व जीवन आनंदाने भरल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदा आणि तू उदारपणे इतरांबरोबर वाटून घेतलेले प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर बनवलेले जावो. प्रेमाचा वारसा तू निर्माण केला आहेस. तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा”.

आणखी वाचा – 06 December Horoscope : कर्क, सिंह, मकर राशीच्या लोकांना शुक्रवारी नशिबाच्या मदतीने मिळणार लाभाच्या संधी, जाणून घ्या…

दरम्यान, स्वप्नील जोशी लवकरच ‘जिलबी’ नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री शिवानी सुर्वेदेखील असणार आहे. याच चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं असून चाहत्यांना त्याच्या या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.  

Tags: swapnil joshiswapnil joshi motherSwapnil Joshi mother birthday
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tharla Tar Mag Serial Update

Tharla Tar Mag : सायली-अर्जुन एकमेकांच्या प्रेमात, लवकरच देणार प्रेमाची कबुली, उत्सुकता वाढली

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.