आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वातून ही जोडी लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. गायनात तरबेज असणारी मुग्धा-प्रथमेश ही जोडी सोशल मीडियावरदेखील तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते त्यांच्या अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात आणि त्यांची ही केमिस्ट्री चाहत्यांनादेखील भलतीच आवडते. (Mugdha Vaishampayan Video)
सोशल मीडियाद्वारे हे दोघे त्यांच्याबद्दलचे अनेक अपडेट्स चाहत्यांना देत असतात. ते दोघं गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र करतातच, त्याबरोबरच ते एकत्र असले की एखादा गाण्याचा व्हिडिओही बनवतात आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करतात. अशातच त्यांनी नुकताच एक नवीन व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश लघाटे असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – बाबा सिद्दीकीआधी सलमान खानला मारायचं होतं पण…; शूटरने स्वत:च केला खुलासा, सांगितला संपूर्ण प्लॅन
प्रथमेश लघाटेच्या युट्यूब चॅनेलचे नुकतेच एक लाख सबस्क्राईबर्स पूर्ण झाले आहेत आणि यानिमित्त त्याची बायको मुग्धाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुग्धाने युट्यूब चॅनेलचे सबस्क्राईबर्स वाढतानाचे काही क्षण या व्हिडीओद्वारे शेअर केले असून याट दोघांनी एकमेकांना अभिनंदनही केलं आहे. “युट्युबवर एक सब्सक्राइबर्स पूर्ण झाल्यानिमित्त अभिनंदन प्रथमेश” असं म्हणत तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – जहागीरदारांच्या घरात लीला पुन्हा येणार का?, एजेंच्या एका निर्णयावर संसार सुरळीत होणार? कथा निर्णायक वळणावर
दरम्यान, गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली. मुग्धा व प्रथमेशच्या गायनाचे लाखो चाहते दिवाने आहेत. लग्नानंतर बरेचदा दोघेही एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसले. विशेषतः प्रथमेश व मुग्धा यांची जोडी लग्नानंतर बरीच चर्चेत राहिलेली दिसली.