रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा…”, ‘शिवा’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री झाली मावशी, भावुक व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 4, 2024 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva serial fame Marathi actress Mansi Suresh shared a special video on social media on the occasion of the birth of her sister's baby.

‘शिवा’ मालिका फेम मराठी अभिनेत्रीने मावशी होताच झाली भावुक, सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत व्यक्त केल्या भावना

आई होणं ही स्त्रीजन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका ‘लेकीची आई’ होणं हे स्त्रीला अधिक समृद्ध करतं. बाळाची चाहूल ही प्रत्येक आईच्या आयुष्यातली महत्त्वाची घटना असते. आई होणं यापेक्षा अभूतपूर्व सुख कुठल्याही स्त्रीसाठी दुसरा कोणतच नसतं. याच आई होण्यापर्यंतचा प्रवास सोपा वाटत असला तरी तो सोपा नसतो. आईपणाशी खूप साऱ्या गोष्टी निगडीत असतात. अशीच आईपणाशी आणि या काळात तिच्याशी निगडीत कुटुंबाची होणारी अवस्था एका अभिनेत्रीने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मानसी सुरेश. मानसी सुरेश सध्या झी मराठी वाहिनीवर ‘शिवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Mansi Suresh Emotional)

अभिनेत्री मानसी सुरेश सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने चार दिवसांपूर्वी शेअर केलेला एक् व्हिडीओ व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने तिच्या बहिणीला झालेल्या बाळाचे काही खास क्षण शेअर केले आहेत. तसंच यावेळी तिने तिच्या व तिच्या कुटुंबियांच्या भावनाही शेअर केल्या आहेत. मानसीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम व्हिडीओवर शेअर केला आहे. तसच या व्हिडीओखाली तिने लिहिलेल्या कॅप्शनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Suresh (@manasisuresh_)

आणखी वाचा – 04 December Horoscope : रवि योगामुळे सिंह राशीसह ‘या’ राशींचेही भाग्य उजळणार? कुणाच्या नशिबात काय? जाणून घ्या…

या व्हिडीओखाली तिने असं म्हटलं आहे की, “मातृत्व… एवढं दुखणं सहन करुन, स्वतःची चिरफाड होऊनसुद्धा आपल्या बाळाला जवळ घेताना मात्र खुश असते ती असते आई. बाळाला जन्म देताना किती वेदना होत असतील? किती मनात प्रश्न असतील? किती भीती वाटत असेल? काय काय होत असेल? हे त्या आईलाच माहित”. पुढे अभिनेत्री म्हणाली, “दीदी तू आई झालीस, बापरे… तू खूप खूप शक्तीशाली आहेस. गेले नऊ महिने ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण जवळ आला आणि शेवटी आम्हाला आमची लक्ष्मी मिळाली. खरंच आई-बाबा होणं सोपं नसतं आणि आता तुमच्या दोघांच्या आयुष्याला नव्याने सुरवात झाली आहे”.

आणखी वाचा – स्वप्नील जोशीने घेतली आलिशान महागडी कार, खास व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “माझ्यासाठी ही फक्त गाडी नाही तर…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी मावशी झाली आहे, मला खूप खूप छान वाटत आहे. एका जीवाला नऊ महिने पोटात वाढवून या जगात सुखरूप घेऊन येणं, त्याला जन्म देणं… स्त्री काहीही करु शकते… काहीही…” तसंच या व्हिडीओमध्ये तिने बहिणीला भेटायला जाण्याच्या आधीच्याही भावना व्यक्त केल्या आहेत. यात तिने असं म्हटलं आहे की, “मी मावशी होणार आहे. तर आता दीदीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. त्यासाठी मी मुंबईहूं निघाली आहे. मी बहिणीला भेटायला जायला खूपच उत्सुक आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडूदेत. हीच बाप्पाकडे प्रार्थना”.   

Tags: Mansi SureshMansi Suresh EmotionalShiva Serial Fame Mansi Suresh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Comedy actor Sunil Pal missing update Mumbai police contact with him see the details

२४ तासांपासून बेपत्ता सुनील पाल अखेर सापडले, पोलिसांनी दिली माहिती, नक्की कुठे गायब होते?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.