शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनुराग कश्यपबरोबरच्या घटस्फोटनंतर कल्की कोचलिनची होती वाईट अवस्था, भाड्यावरही घर मिळालं नाही तेव्हा…

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 29, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kalki Koechlin on anurag kashyap divorce

कल्की कोचलिनची घटस्फोटानंतर झाली होती वाईट अवस्था

बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिन ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसली आहे. २०११ साली कल्की प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र २०१५ साली दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर कल्की अधिक चर्चेत आली. नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये तिने घटस्फोटानंतर आयुष्यात काय बदल झाले? त्याबद्दल सांगितले आहे. घटस्फोट झाल्यानंतर एकटं राहणं किती कठीण होतं. तसेच कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला याबद्दल ती सांगताना दिसली. एकटीसाठी घर शोधताना अनेक समस्यांचा सामना तिला करावा लागला होता. याबद्दल ती पहिल्यांदाच बोलताना दिसली आहे. (Kalki Koechlin on anurag kashyap divorce)

कल्कीने ‘आफ्टरआव्हर्स विद ऑल अबाऊट इव्ह’ या युट्यूब चॅनलबरोबर संवाद साधला. यावेळी ती म्हणाली, “जेव्हा माझा आणि अनुरागचा  घटस्फोट झाला तेव्हा ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ व ‘ये जवानी है दिवानी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. नंतर माझा घटस्फोट झाला. नंतर मला राहाण्यासाठी जागादेखील नाही मिळाली. कोणीही मला मुंबईमध्ये एकटी महिला म्हणून भाड्यावर कोणीही घर देत नव्हतं”.

आणखी वाचा – समांथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली, “बाबा गुडबाय पुन्हा…”

View this post on Instagram

A post shared by Marine Assaiante | Mom to Be series (@marine.assaiante)

पुढे ती म्हणाली की, “मी विचार करायचे की मी प्रसिद्ध आहे. तुम्हाला माझ्याबरोबर सेल्फी घ्यायचा असतो पण तुम्हाला मला घर द्यायचे नसते”. कल्कीने अनुरागचा चित्रपट ‘देव डी’ या चित्रपटातून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर लगेच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. नंतर लगेच २०११ साली त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – अभिनेत्री रेश्मा शिंदेने दाक्षिणात्य पद्धतीनेही केलं लग्न, भर मंडपात नवऱ्याला मारली मिठी, भावुक क्षण समोर

दरम्यान तिचा एक इस्रायली बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. २०१९ साली तिने गरोदर असल्याची घोषणा केली होती. २०२३ साली ती ‘खो गये हम कहा’ या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तसेच गेल्या वर्षी ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात एक आयटम नंबर करतानादेखील दिसली होती. अनुरागच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करताना दिसून येतो.  

Tags: anurag kashyapdivorceKalki Koechlin
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
30 November 2024 daily horoscope Saturday is a good day for Aries, Taurus, Gemini people

30 November Horoscope : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस चांगला, तुमच्या नशिबात नेमकं काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.