रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाचे आमिष दाखवून शोषण, ‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्यावर महिलेचे आरोप, नेमकं प्रकरण काय?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 28, 2024 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pushpa The Rise movie fame actor Shritej accused of exploitation by a woman in the name of marriage

‘पुष्पा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या अडचणीत वाढ, लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप

अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा २’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वच  माध्यमांमध्ये जोरदार चर्चा असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच आता या चित्रपटासंबंधित एका अभिनेत्याबद्दलची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनच्या भावाची भूमिका साकारुन प्रसिद्ध झालेला तेलुगू अभिनेता श्री तेजवर लग्नाच्या वचनबद्धतेच्या बहाण्याने भावनिक, आर्थिक आणि शारीरिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका महिलेने या अभिनेत्याविरोधात हैदराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण? (Shritej Accused Of Exploitation)

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पुष्पा स्टार श्रीतेजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कुकटपल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. श्रीतेजने लग्नाचे आमिष दाखवून २० लाख रुपयांची आर्थिक मागणी केली, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिच्याबरोबर रिलेशनशिप असूनही अर्चना नावाच्या दुसऱ्या महिलेबरोबरही त्याचे संबंध होते आणि तिच्यापासून त्याला सात वर्षांचा मुलगाही असल्याचा दावा तिने केला आहे.

View this post on Instagram

A post shared by ShriTej 22 (@actorshritej)

आणखी वाचा – ऐश्वर्या रायने ‘बच्चन’ आडनाव काढले? दुबईमधील ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण, नात्यातील तणाव आणखी वाढला  

पीडितेने असाही आरोप केला आहे की, तिने प्रथम या वर्षी एप्रिलमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी तिला या प्रकरणी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे महिलेने ही तक्रार मागे घेतली होती. यापूर्वी माधापूर पोलिस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता योग्य ते पुरावे शोधून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तपास सुरु केला आहे. याच पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अभिनेता श्रीतेज विरुद्ध बीएनएस ६९, ११५ (२), आणि ३१८(२) सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा – मेहंदी है रचनेवाली! रेश्मा शिंदेच्या हातावर रंगली मेहंदी, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

दरम्यान, श्रीतेजला कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश यांची पत्नी अर्चना यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याने ते यापूर्वी वादात सापडले होते. त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘पुष्पा’, ‘वांगवेती’, ‘धमाका’, ‘मंगलवरम’ आणि ‘बहिष्करण’ यांसारख्या प्रसिद्ध तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या भूमिकांद्वारे श्रीतेजने इंडस्ट्रीत आपली छाप पाडली आहे. मात्र कायदेशीर अडचणीत अडकल्याने त्यांची प्रतिमा खराब झाली आहे.

Tags: Actor Shritej Accused Of Exploitation NewsPushpa Fame Actor Shritej Accused Of ExploitationShritej Accused Of Exploitation
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Milind Gawali Emotional

Video : "हे क्षण बघायला आई नाहीये", म्हणत मिलिंद गवळी भावुक, तर मधुराणी प्रभुलकरला अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.