बॉलिवूडचा ‘परफेक्टशनिस्ट’ आमिर खान हा गंभीर व्यक्तिमत्व असलेला अभिनेता समजला जातो. पण फार कमीच जणांना तो ख-या आयुष्यात खूप खोडकर असल्याचे माहित असेल. या अभिनेत्याला आपल्या सहअभिनेत्रींच्या हातावर थुंकण्याची सवय आहे. त्याच्या या सवयीचा अनुभव आजवर अनेक अभिनेत्रींना आला आहे. मात्र, आमिर असे का करतो याचे उत्तर कोणालाच माहित नाही. याचाच उलगडा खुद्द आमिरनेच केला होता. १८ व्या ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला ९०च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘जो जिता वही सिंकदर’ चित्रपटाच्या टीमने उपस्थिती लावली होती. त्याचवेळी आमिरबरोबर या चित्रपटात काम करणारी नृत्य दिग्दर्शिका फराह खानने याबद्दल सांगितलं होतं. (Aamir Khan Spit on Co-Actresses’ hands)
‘जो जिता वही सिंकदर’मधील टीम ‘मामि’ चित्रपट महोत्सवाला उपस्थित होती. त्यावेळी फराह खान म्हणाली होती की, “आमिरला त्याच्या सहअभिनेत्रींच्या हातावर थुंकण्याची सवय होती. तो अजूनही असे करतो. मला तुझा हात बघू दे.. असे सांगत तो लगेच हातावर थुंकतो”. यावर लगेचच उत्तर देत आमिर म्हणाला की, “मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकले त्या नंबर वन झाल्या”. आमिरने असे उत्तर देताच चित्रपटातील त्याची सहअभिनेत्री पूजा बेदी ही बोलण्यासाठी पुढे सरसावत, “माझी मुलगी आलियाला मी आमिर अंकलची भेट घे म्हणून सांगणार आहे. त्यावेळी त्याने तुझ्या हातावर थुंकणे गरजेचे आहे” असे ती हसत म्हणाली.
आणखी वाचा – “इतरांना काहीही बोलूदेत पण…”, लेकाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत अमिताभ बच्चन, म्हणाले, “वाईट विचार करणं…”
आमिरच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्यामुळे अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाला होता. दरम्यान, आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘लाल सिंग चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला. मात्र, आता तो एकाच वेळी ६ चित्रपटांवर काम करत आहे. याबाबत आमिर खानने हॉलिवूड रिपोर्टरला सांगितले की, “मी माझ्या आयुष्यात एकाच वेळी सहा चित्रपट कधीच केले नाहीत. यावेळी माझ्याकडे त्याचे स्वतःचे कारण होते. शेवटी जेव्हा मी ठरवले, ‘ठीक आहे, मी चित्रपट सोडणार नाही, पुढचा विचार माझ्या मनात आला की, कदाचित ही माझ्या सक्रिय जीवनाची शेवटची १० वर्षे आहेत”.
आणखी वाचा – यशने रेवतीला दिली प्रेमाची कबुली, एजेंसमोर सत्य येणार का?, लीलाचा पाठिंब कायम पण…
यापुढे आमिर असं म्हणाला की, “तुम्ही जीवनावर विश्वास ठेवू शकत नाही. मी आता ५९ वर्षांचा आहे. आशा आहे की, मी ७० वर्षांचा होईपर्यंत पुरेसा निरोगी असेन. म्हणून, मग मी विचार केला, मी माझी शेवटची १० वर्षे सर्वात फलदायी बनवायला हवी. त्याहीपेक्षा, मी जसजसे मोठे होत जातो, तसतसे मला लेखक, दिग्दर्शक आणि सर्व सर्जनशील लोकांवर विश्वास असलेल्या प्रतिभांचे समर्थन करायचे आहे. मी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्त होण्यापूर्वी, मला विश्वास असलेल्या प्रतिभांसाठी एक व्यासपीठ व्हायचे आहे. त्यामुळे मी आणखी चित्रपट करणार आहे”.