सिनेविश्वात काम करत असताना काही कलाकार मंडळी एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेचा, त्या कथेचा सखोल अभ्यास करतात. आपण ती भूमिका साकारू का? त्या भूमिकेतून प्रेक्षकांपर्यंत आपण काही पोहचवू शकतो का या सगळ्याच बाबींचा एक कलाकार ती भूमिका स्वीकारण्याआधी विचार करतो. अशीच एक भूमिका अभिनेते मिलिंद गवळी यांनी नाकारली होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत काम करण्याची संधी केवळ भूमिका नाही आवडली म्हणून मिलिंद यांनी गमावली.(Milind Gawali New Post)
मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून मी स्मिता जयकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबत त्यांनी कॅप्शन देत लिहिलं आहे की, नियती कसा खेळ खेळत असते बघा, एखाद्या व्यक्तीची आपल्याला नियतीला जर भेट घालून द्यायची असेल तर कशीही काहीही करून ती व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतेच येते,
पाहा का नाकारला मिलिंद यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट (Milind Gawali New Post)
पंचवीस तीस वर्षांपूर्वी रमेश साळगावकर नावाचे दिग्दर्शक माझ्याकडे “सत्वपरीक्षा” नावाचा सिनेमा घेऊन आले होते, या चित्रपटांमध्ये मला त्यांनी एक भूमिका याचा आग्रह केला होता, लक्ष्मीकांत बेर्डे हिरो, रेशम टिपणीस हीरोइन आणि मला व्हिलनचा रोल त्यांनी ऑफर केला होता, मी विलन आहे म्हणून मी तो रोल स्वीकारला नाही आणि तो चित्रपट केला नाही, या चित्रपटामध्ये स्मिता जयकर त्या विलनच्या आई ची भूमिका करत होत्या, त्यांना भेटायची त्यांच्याबरोबर काम करायची संधी माझी गेली.(Milind Gawali New Post)
हे देखील वाचा – निवेदिता आणि अशोक सराफ यांचा परदेश दौरा
यावेळी त्यांनी लिहिलं की लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुख्य नायक असणाऱ्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारायला मिळणार या कारणास्तव मिलिंद यांनी त्यांना ऑफर करण्यात आलेली चित्रपटातील भूमिका त्यांनी नाकारली. मिलिंद गवळी यांनी आजवर अनेक विविधअंगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या मिलिंद यांची आई कुठे काय करते मालिकेतील अनिरुद्ध ही ग्रे शेड असलेली भूमिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मिलिंद यांची खलनायिका भूमिका असली तरी त्यांच्या या भूमिकेवर चाहते भरभरून प्रेम करताना दिसत आहेत.
