सिनेसृष्टीत उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी बाजू पेलवणारा अभिनेता म्हणजे अभिनेते महेश कोठारे. अभिनयासोबत त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन ही केलं आहे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेऊन महेश कोठारे यांनी बरेच चित्रपट केले. एका काळानंतर एखाद्या कलाकाराला यश मिळत त्यानंतर अर्थात त्याच विमान हे हवेत काहीशा जास्त उंचीवर उडत असणार यात दुमत नाहीच, याबाबतचा एक किस्सा महेश कोठारे यांनी त्यांच्या डॅम इट आणि बरच काही या पुस्तकात सांगितला आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे तो किस्सा आजच्या जपलं ते आपलं या भागात.
धुमधडाकाच्या यशानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांना भरपूर काम मिळालं होत. टेलिव्हिजन, नाटक, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपलं भक्कम स्थान मिळवलं होत. त्याचदरम्यान महेश कोठारे हे दे दणादण चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणार होते. आणि या चित्रपटात लक्ष्या हवा असा महेश कोठारे यांचा अट्टाहास होता. त्यानुसार महेश कोठारे लक्ष्याला भेटायला गेले, लक्ष्याच्या हालचालीवरून त्याच यशाचं विमान जास्त उंचीवर असल्याचं कळत होत. (Mahesh Kothare Laxmikant Berde)
पाहा का स्वीकारली लक्षाने कोठारेंची ऑफर (Mahesh Kothare Laxmikant Berde)

याबाबतचा किस्सा सांगत महेश कोठरे यांनी लिहिलं आहे की, लक्ष्या मी आता दे दणादण सुरु करतोय, असं महेश कोठारे म्हणाले यावर लक्ष्या त्यांना म्हणाला, माझ्या तारखा मिळणं खूप कठीण झालंय रे! खूपच बिझी झालोय रे मी!” लक्ष्या आपल्या व्यग्रपणाचा मुद्दा मांडत असताना मी त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. महाभारतात अर्जुनापुढे केवळ माश्याचा डोळा होता, तसंच ‘दे दणादण च्या वेळी काही झालं तरी लक्ष्या आपल्या चित्रपटात हवा, हे मी ठरवून टाकलं होतं.
“ते नंतर बोलू आपण. आधी तू पैसे किती घेणार ते सांग!” असं कोठारेंनी लक्ष्याला विचारलं, यावर लक्ष्या म्हणाला, “मी किती घेतो, त्याची मार्केटमध्ये चौकशी कर ना!” लक्ष्मीकांत अजूनही हवेतून खाली यायला तयार नव्हता. मी पुन्हा एकदा स्वतःवर नियंत्रण ठेवलं. “अच्छा! मी चौकशी करू म्हणतोस? पण तूच सांग ना, आता तू किती घेतोस ते!” माझ्या आग्रहामुळे लक्ष्यानं एक रक्कम मला सांगितली. ती ‘धुमधडाका’च्या मानधनाच्या साडेतीन पटीहून अधिक होती. ही रक्कम अशोक सराफच्या मानधनाइतकीच होती. लक्ष्याला वाटलं होतं की त्याने मानधनाचा जो आकडा सांगितला, तो ऐकल्यानंतर मला आश्चर्याचा धक्काविक्का बसेल! पण मी त्या वेळी तसं त्याला काही जाणवू दिलं नाही, ‘ठीक आहे!’ एवढंच मी त्याला उत्तर दिलं.(Mahesh Kothare Laxmikant Berde)
हे देखील वाचा – तीर्थयात्रेला न जाता निवेदिता पोहचल्या लंडनला
मी मनातल्या मनात विचार केला होता, की याच्याशिवाय माझा पिक्चर काही होणार नाही. त्यामुळे लक्ष्या मला काही केलं तरी हवाच होता. इथं मी लक्ष्यासमोर आणखी एक गुगली टाकली. “”लक्ष्या, तू जो मानधनाचा आकडा सांगितलास ना, त्यात मी आणखी एक हजाराची भर घालतो. तसेच सगळे पैसे मी तुला आत्ताच्या आत्ता देतो. तूही मला लगेचच तुझ्या ‘शूटिंग डेट्स देऊन टाक, माझ्या या गुगलीवर लक्ष्मीकांत गोंधळल्याचं माझ्या लक्षात आलं.
त्याने उत्तर करत म्हटलं, “आत्ता ?” यावर कोठारे म्हणाले, “हो, आत्ताच !” असं म्हणून कोठारे थांबले नाहीत, पुढे कोठारे यांनी सांगितलंय, तर माझ्यासोबत असलेली बॅग मी उघडली. त्यातून एक चेकबुक काढल आणि ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ या नावानं त्यानं सांगितलेल्या रकमेत एक हजाराची भर घातली. तो चेक फाडला आणि त्याच्या हातामध्ये सोपवला.(Mahesh Kothare Laxmikant Berde)
“चेक घेऊन टाक; पण मला तुझ्या तारखा आत्ताच्या आत्ता दे!” गंमत म्हणजे माझ्या तारखा मिळणं कठीण आहे, हे म्हणणाऱ्या लक्ष्यानं आता इतर सगळ्या सिनेमाच्या तारखा माझ्यासमोरच फिरवल्या आणि त्या सगळ्या तारखा मला देऊन टाकल्या. या सगळ्या मानधनाच्या नाट्याकडे मी तेव्हा थोडं मानापमान पद्धतीनं पाहिलं होतं. तसं ते पाहायला नको होतं; कारण मुळात अभिनय हा देखील एक व्यवसायच आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपण करीत असलेल्या कामातून सर्वोत्तम मोबदला मिळायलाच हवा. त्यामुळे लक्ष्मीकांतबद्दल माझ्या मनात कोणतीच अढी राहिली नाही.
