रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात, रुग्णालयात केलं भरती, आता कशी आहे परिस्थिती?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 17, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Popular Marathi actress Nishigandha Wad injured in accident at Suman Indori serial set

अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात, एका दृश्याचे चित्रीकरण करताना घसरल्या अन्...; अधिक जाणून घ्या...

मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक चिंताजनक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मराठी अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात झाला आहे. ‘सुमन इंदोरी’ या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांचा अपघात झाला असून दुखापतीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अशनूर कौर, अनिता हसनंदानी आणि झैन इमाम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मालिकेत निशिगंधा या सुमित्रा मित्तलची भूमिका साकारत आहे. सेटवरील एका दृश्यादरम्यान ही दुर्घटना घडली, ज्यामुळे कलाकार आणि क्रू मेंबर्सलादेखील धक्का बसला आहे. (Nishigandha Wad Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, एका मालिकेतील एका दृश्याचे चित्रीकरण करताना निशिगंधा घसरल्या. त्यामुळे त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना आता पुढचे काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेनंतर सुमन इंदोरीचे शूटिंग तात्पुरते थांबवण्यात आले. क्रू मेंबर्सने चाहत्यांना आश्वासन दिले आहे की, ते सेटवर प्रत्येकाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nishigandha Waad (@nishigandhawad)

आणखी वाचा – स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ मालिका घेणार का प्रेक्षकांचा निरोप?

प्रोडक्शन टीमकडून असं सांगण्यात आले आहे की, “हा एक अनपेक्षित अपघात होता आणि निशिगंधा आता धोक्याबाहेर असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटत आहे. त्या एक खंबीर स्त्री  आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहोत.” निशिगंधा या मराठीसह हिंदी टेलिव्हिजन व चित्रपटांचा एक लोकप्रिय चेहरा आहेत. अशातच त्यांच्या अपघाताच्या माहितीने अनेक चाहते मंडळी चिंतेत आहेत.

आणखी वाचा – दुबईमध्ये अलिशान घर, वांद्रेमध्ये पाच बीएचके बंगला अन्…; ऐश्वर्या राय बच्चनकडे इतकी आहे प्रॉपर्टी, एकूण किंमत आहे…

दरम्यान, ९०च्या दशकातील मराठी चित्रपटांमधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ‘ससुराल सिमर का’, ‘मेरी गुडिया’, ‘कभी कभी इत्तेफाक से’, ‘रब से है दुआ’ आणि इतर मालिकांमध्येही काम केले आहे. मराठी नंतर निशिगंधा वाड यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये देखील नाव अजमावलं आणि सफलता मिळवली.

Tags: marathi actressNishigandha WadNishigandha Wad Accident
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
South actor Naga Chaitanya and actress Shobhita Dhalipa will soon tie the knot before their wedding card viral on social media.

ठरलं तर मग! नागा चैतन्य व शोभिता ‘या’ दिवशी विवाहबंधनात अडकणार, सोशल मीडियावर पत्रिका व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.