रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ‘द कपिल शर्मा शो’ का सोडला? पाच वर्षांनी सांगितले नेमकं कारण, म्हणाले, “राजकीय…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 15, 2024 | 9:39 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
cricketer and politician Singh Sidhu revealed the exact reason for quitting The Kapil Sharma Show after five years.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी 'या' कारणामुळे सोडला होता द कपिल शर्मा शो, स्वत:च केला खुलासा

कॉमेडी विश्वात कपिल शर्मा सध्या अग्रेसर आहे. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’मधून त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ घेऊन आला. नेटफ्लिक्समुळे आता तो जगभरात पोहोचला आहे. माजी क्रिकेटर आणि राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू हे कपिल शर्मा शोच्या आधीच्या सीझनचा एक महत्त्वाचा भाग होते. कॉमेडियन कपिल आणि इतर कलाकारांबरोबरची त्यांची जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली होती. (Navjyot Singh Sidhu On The Kapil Sharma)

काही कारणास्तव २०१९ मध्ये नवज्योत सिद्धू यांनी कपिलचा शो सोडला. त्यांच्या जाण्यानंतर अर्चना पूरण सिंहने शोमध्ये प्रवेश केला. अशातच आता नवज्योत सिद्धू पुन्हा एकदा कपिलच्या शोमध्ये दिसणार आहेत. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या पुढच्या एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू आपल्या पत्नीबरोबर येणार आहेत. त्याचा प्रोमोही रिलीज झाला आहे. यावेळी त्यांनी कपिल शर्मा शो सोडल्याबद्दलचे नेमके कारण सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

याबद्दल ते म्हणाले की, “राजकीय कारणे होती आणि मला त्याबद्दल बोलायचे नाही. वेगवेगळी कारणे होती आणि गुलदस्ता तुटला. माझी इच्छा आहे की पुष्पगुच्छ जसा होता तसाच एकत्र ठेवला जाईल. तर, कपिलचा शो खूप चांगला चालला आहे. तो बऱ्यापैकी हुशार आहे. द ग्रेन टॉक शोला दिलेल्या मुलाखतीत सिद्धू यांनी कपिल शर्माबरोबर काम करतानाचा अनुभवही शेअर केला. याबद्दल त्यांनी सांगितले की, “जेव्हा तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो’मध्ये होता तेव्हा त्याच्या शोच्या अनेक सीझनमध्ये ते कपिलबरोबर होते.

आणखी वाचा – स्वतः लग्न न करता रस्त्यावरच्या लाखो पिढींना घडवणारी ‘आई’, अनाथ मुलांसाठी देवासारखी धावणारी ही महिला आहे तरी कोण?

कपिलबरोबरच्या कामाबद्दल बोलताना सिद्धू म्हणाले की, “त्यांचा शो हा देवाने तयार केलेल्या गुलदस्त्यासारखा आहे ज्यामध्ये प्रत्येक सदस्याने स्वतःचे आकर्षण जोडले आहे”. दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांनी कपिल शर्मा शो जेव्हा सोडला तेव्हा असे बोलले जात होते की, त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्याच्या एका कमेंटवरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने शो सोडला होता.

आणखी वाचा – 15 November Horoscope : शुक्रवारी धनलाभ योगाचा शुभ संयोग, त्यामुळे मेष व मीन राशीच्या लोकांवर असणार महालक्ष्मीची कृपा

नवज्योत सिंग सिद्धू यांच्यानंतर अर्चना पुरण सिंह यांनी शोमध्ये सहभाग घेत त्यांची जागा घेतली आणि गेले काही दिवस त्या कपिल शर्मा शोच्या महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. हा शो प्रेक्षकांना हसवण्याचे काम करतो. गेली अनेक वर्षे कपिल शर्माने प्रेक्षकांच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे आणि ते गारुड अजूनही कायम आहे.

Tags: Navjyot Singh SidhuNavjyot Singh Sidhu On The Kapil Sharmathe kapil sharma show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial

Paaru Marathi Serial : आदित्यच्या आयुष्यात आलेली ती मुलगी आहे तरी कोण?, पारूपासून कायमचा दुरावणार का?, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.