रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tharala Tar Mag : दिवाळीनिमित्त अर्जुनकडून सायलीला खास गिफ्ट, मधूभाऊंची सुटका करणार अन्…; अखेर बाप-लेकीची भेट होणार

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 10, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharala Tar Mag serial update Arjun will bring Madhubhau and Sayali meeting on the occasion of Diwali

Tharala Tar Mag मालिकेत अर्जुन सायली व मधुभाऊंची भेट घडवून आणणार, नवीन प्रोमो व्हायरल

स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे. मालिकेतील रंजक वळण आणि अर्जुन-सायली यांची केमिस्ट्रीमुळे ही मालिका अनेक दिवस टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. सायली आणि अर्जुनमध्ये झालेल्या गैरसमजामुळे त्यांच्या नातं पुन्हा एका वेगळ्याच वळणावर आलं आहे. अर्जुन मधूभाऊंची केस लांबणीवर टाकणार असल्याचा गैरसमज सायलीचा झाला आहे. त्यामुळे तिच्या आणि अर्जुनच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. पण आता दिवाळीत त्यांच्यातीळ हे सगळे गैरसमज संपणार आहेत. दिवाळीच्या दिवशी अर्जुन सायलीला खास भेट देऊन तिचे सगळे गैरसमज दूर करणार आहे. (Tharala Tar Mag Serial Update)

‘ठरलं तर मग’ या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमधून अर्जुनने मधुभाऊंची सुटका केल्याचे पाहायला मिळत आहे. तुळशीसमोर दिवा लावताना मधुभाऊ आपल्या लेकीला आवाज देतात. आपल्या वडिलांना सणाच्या दिवशी घरी परत आलेलं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. ती धावत जाऊन मधुभाऊंना मिठी मारते आणि मधुभाऊंना पाहून सायलीला अश्रु अनावर होतात. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यामध्ये गैरसमज दूर होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लेक बनली ‘या’ महागड्या मोबाईल कंपनीची ब्रॅंड अँबॅसेडर, आईने शेअर केली कौतुकास्पद पोस्ट, म्हणाली, “टॅलेंट असेल तर…”

मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये सायली अर्जुनला म्हणते की, “तुम्ही मधूभाऊंची केस मुद्दाम लांबणीवर टाकत होतात? तुमच्यामुळे मी मधूभाऊंना परत कधीच भेटू शकणार नाहीये. चांगली भेट दिलीत मला दिवाळीची. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके वाईट असाल”. त्यानंतर अर्जुन दिवाळीच्या दिवशी मधुभाऊंनाच घेऊन घरी येतो. त्यावेळी मधूभाऊ म्हणतात की, “जावईबापूंनी बेलवर सोडवून आणलं आहे मला”. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की, “तुम्हाला वाटतो इतकाही मी वाईट नाही” आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते. 

आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम छोटा पुढारीने थेट मुंबई गाठत घेतली निक्की-अरबाजची भेट, दोघांनी घन:श्यामला दिलं ‘हे’ आश्वासन, म्हणाले…

दरम्यान, मालिकेचा हा नवीन ट्विस्ट सर्वांनाच आवडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते मंडळी या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर हा क्षण आला आहे. त्यामुळे आता सायली-अर्जुन यांच्या प्रेमाला नवा बहर येणार का याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. अर्थात अनेकांनी हे स्वप्न नको असूदे अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.                     

Tags: Tharala Tar Mag Marathi SerialTharala Tar Mag Marathi Serial UpdatesTharala Tar Mag Serial Update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
05 November 2024 Monday daily horoscope day is beneficial for Aries, Aquarius and Pisces people

11 November Horoscope : सोमवारचा दिवस मेष, कुंभ व मीन राशीच्या लोकांसाठी फायद्याचा, इतरांच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.