ब्युटी विथ ब्रेन अशी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे, मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमातून श्रुतीने तिच्या कामाची छाप पडली. सनई चौघडे या चित्रपटातून श्रुतीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.मुंबई पुणे मुंबई २, बंध नायलॉनचे, रमा माधव या चित्रपटांमध्ये श्रुती झळकली.मालिका हा कलाकारांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो, मालिकेच्या माध्यमातून कलाकार त्या ठराविक वेळेला मोठ्या काळापर्यंत रोज प्रेक्षकांच्या नजरेसमोर असतात.मालिकांमुळे कलाकारांच्या नावाला एक ओळख मिळते.तसेच,श्रुतीची राधा ही बावरी ही मालिका तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरली.आणि श्रुती मराठे नावाला ओळख मिळाली असं म्हणायला हरकत नाही. या मालिकेत श्रुती नायिकेच्या रूपात पाहायला मिळाली.(Shruti Marathe Struggle Story)
श्रुतीला अभिनेत्री व्हायचं होत हे तिने सुरवातीपासूनच ठरवलं होत,तिच्या निर्णयाला घरच्यांनी देखील कायम पाठिंबा दिला.सनई चौघडे या श्रुतीच्या चित्रपटानंतर मराठी मध्ये तशी तिला फार कामाची ऑफर आली नाही. आणि त्यांनतर श्रुती साऊथ चित्रपटांकडे वळली.तेव्हा तिने तमिळ मध्ये चार आणि कन्नड मध्ये एक चित्रपट केला.
पाहा श्रुतीला मराठीत काम मिळणं का झालं होत कठीण? (Shruti Marathe Struggle Story)
साऊथ मध्ये श्रुतीला चांगल काम मिळत होत,पण तीच मन साऊथ मध्ये मन रमत नव्हतं, कारण तिला ती भाषा येत नव्हती. आणि श्रुतीच असं म्हण होत की, मला ती भाषा येत नव्हती त्यामुळे अभिनेत्री म्हणून काम करताना माझ्यावरती बंधन येत होती.त्यामुळे साऊथ मध्ये काम करताना श्रुतीला काम करण्याचं आनंद मिळत नव्हता.
त्यानंतर श्रुतीने ठरवलं कि तीने पुन्हा मराठी मध्ये काम सुरु करावं. पंरतु मराठी मध्ये पुनरागमन करण्याचा श्रुतीचा तो एक वेगळा प्रवास होता.याच्या मागचं कारण असं होत की, जेव्हा श्रुतीने मराठी मध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला, तो पर्यंत श्रुती साऊथ सिनेसृष्टीकडे वळली आहे हे सर्वाना कळालं होत.त्यामुळे आता ती मराठी मध्ये पुन्हा काम करणार नाही हे काही लोकांनी परस्परच ठरवलं असं श्रुतीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.त्यामुळे पुन्हा मराठी मध्ये काम मिळवायला परत श्रुतीला एक-दोन वर्ष गेली.आणि त्यांनतर श्रुतीने राधा ही बावरी मालिका केली आणि तो तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला.(Shruti Marathe Struggle Story)

हे देखील वाचा : वडिलांच्या निधनानंतर आलेली ती वेळ निभावणं कठीण होत!तरीही भाऊ कदम थांबले नाहीत
श्रुती टॅलेंटच कम्प्लिट पॅकेज आहे असं म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही, कारण अभिनयासोबतच श्रुती एक उत्तम डान्सर आहे. त्याचसोबत सोबत कराटे मध्ये देखील श्रुती ब्राउन बेल्ट पर्यंत पोहचली आहे. श्रुतीची आई अॅथलेट असल्यामुळे श्रुतीमध्ये स्पोर्ट्सची आवड आईकडून जोपासली गेली.