शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर प्रतिक्षा संपली! ‘आठवी अ’च्या भरघोस यशानंतर ‘दहावी अ’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुहूर्त सोहळा संपन्न, उत्सुकता शिगेला

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 7, 2024 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Itsmajja and Kori Pati Production upcoming and awaited series Dahavi-A wrapped up and the shooting started.

इट्स मज्जा व कोरी पाटी प्रोडक्शनच्या दहावी-अ या सीरिजचा मूहर्तू संपन्न, शूटिंगला सुरुवात

‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. या सीरिजने गेले अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे या सीरजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे या सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे. पण अखेर २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Dahavi-A Series Shooting Starts)

‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे अनेक चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. अनेकांनी ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे दु:ख व्यक्त केलं होतं. ही सीरिज कधीच संपू नये अशा प्रतिक्रियादेखील त्यांनी व्यक्त व्यक्त केल्या होत्या. मात्र प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. त्यामुळे या सीरिजने काही दिवसांपूर्वी सर्वांचा निरोप घेतला आहे. मात्र या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ही सीरिज कधी सुरु होणार याची उत्सुकता लागून राहिली होती.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “दोन्ही वर्षी पुरस्कार न मिळाल्याने हिरमुसल्यासारखं…”, पुरस्कार न मिळण्यावरुन ऐश्वर्या नारकरांचं भाष्य, म्हणाल्या, “दुर्देवाने…”

अशातच आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे ती म्हणजे ‘दहावी-अ’च्या शूटिंगचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे. ‘दहावी-अ’ या बहूप्रतिक्षित सीरिजचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला असून या सीरिजच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. श्रीगणरायाला वंदन करुन ‘इट्स मज्जा’चे प्रमुख शौरीन दत्ता यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला आणि ‘दहावी-अ’च्या शूटिंगला सुरवात झाल्याची अधिकृत घोषणा केली. या मुहूर्ताचे खास क्षण सोशल मीडियावर नुकतेच शेअर करण्यात आले आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेक प्रेक्षकांनी ‘इट्स मज्जा’च्या आगामी ‘दहावी-अ’साठी उत्सुकता व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “स्त्रीत्व उत्तेजित पद्धतीने दाखवण्याला विरोध अन्…”, नीना कुळकर्णींनी सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाल्या, “थोबाडीत देईन…”

दरम्यान, ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर आता ‘इट्स मज्जा’ आणि ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ ‘दहावी-अ’ ही वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या आगामी सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून आता आणखी कोणती नवीन कथा दिसणार? ही नवीन सीरिज कधी प्रदर्शित होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.   

.       

Tags: Dahavi-A Series Shooting StartsItsmajja and Kori Pati Productions Dahavi-A SeriesItsmajja Original Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Shah Rukh Khan Death Threat

सलमान खाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, ५० लाख रुपयांची मागणी कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.