शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या पाच वर्षानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, वेस्टर्न स्टाइलमध्ये केलं डोहाळ जेवण, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 1, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Neha Gadre Pregnancy Good News

मराठी अभिनेत्री लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई! ऑस्ट्रेलियात केलं जेंडर रिव्हिल

Neha Gadre Pregnancy Good News  : सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्या कला विश्वाला रामराम करत संसारात रमल्या. बॉलीवूड पासून ते अगदी मराठी कलावकरांपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेल्या पाहायला मिळाल्या. अभिनयक्षेत्र सोडून ही कलाकार मंडळी परदेशात स्थायिक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच नेहा गद्रे. नेहा काही दिवसांपासून चर्चेत असलेली पाहायला मिळतेय. काही वर्षांपूर्वी नेहाने तिच्या पतीसह परदेशात राहण्याचा निर्णय घेतला आणि तिने मालिका विश्वाला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. गेली बरेच वर्ष नेहा मालिका विश्वात कार्यरत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच नेहा गद्रे. याशिवाय ‘गडबड झाली’, ‘मोकळा श्वास’ या चित्रपटांमधून नेहाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना नेहाने मालिका विश्वातून काढता पाय घेत अभिनय सृष्टीतून ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं आणि नेहा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. ईशान बापट बरोबर लग्न झाल्यानंतर तिने संसाराकडे विशेष लक्ष दिलं. इतकंच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियात राहूनही शिक्षिकेची पदवी मिळवली. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली नेहा सध्या चर्चेत आली आहे ती म्हणजेच लवकरच नेहा आई होणार आहे.

आणखी वाचा – बहीण असावी तर अशी! लाडक्या भावासाठी अंकिता वालावलकरने गाठलं थेट कोल्हापूर, डीपी दादांना भाऊबीज केली अन्…; फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by NEHA GADRE ❤ (@nehagadre12)

आई होणार असल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली. तिने आपल्या नवऱ्याबरोबर बेबी बंब दाखवत गोड व्हिडीओ शेअर केला. समुद्रकिनारी फोटोसाठी पोज देताना ही जोडी पाहायला मिळाली. त्यानंतर आता नेहाने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. नेहाने तिच्या डोहाळ जेवणाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. मात्र, या डोहाळे जेवणाच्या व्हिडीओमध्ये एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये नेहा व तिचा पती ईशान बाळाच्या जन्माआधीच जेंडर रिव्हील करताना दिसत आहेत.

आणखी वाचा – भर दिवाळीमध्ये माधुरी दीक्षितसह घडला होता ‘हा’ प्रसंग, केसही जळले होते अन्…; अभिनेत्रीनेच केला खुलासा

बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे भारतात बेकायदेशीर आहे मात्र विदेशात याला परवानगी आहे. त्यामुळे नेहाने मुलगा होणार की मुलगी हे खुलेआमपणे या व्हिडीओमधून सांगितलं असल्याचे दिसतेय. बेबी बापट कोण असेल?, तुम्हा सगळ्यांसमोर रिव्हील करण्याची हिचं योग्य वेळ आहे”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा सुंदर असा गाऊन, डोक्यावर तिआरा घालून नेहा अगदी राजकुमारीसाठी तिच्या डोहाळ जेवणासाठी तयार झालेली दिसली. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेवटी निळ्या रंगाची वाफ सर्वत्र पसरल्याचे दिसत आहे आणि यावरुनच अभिनेत्रीला मुलगा होणार असल्याचे स्पष्ट झालं. मुलगी होणार असेल तर गुलाबी रंग आणि मुलांसाठी जेंडर रिव्हील करताना निळ्या रंगाचा वापर केला जातो. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.

Tags: Neha Gadre baby showerNeha Gadre Pregnancy Good Newsneha gadre pregnant
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Singham Again Review

Singham Again Review : ‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहावा की नाही? पहिला रिव्ह्यू समोर, प्रेक्षकांच्या वेगळ्याच प्रतिक्रिया

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.