शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Tula Shikvin Changlach Dhada : चारुलता व भुवनेश्वरीचं सत्य शोधणार अक्षरा, खरा चेहरा लवकरच येणार समोर, अधिपतीही मदत करणार का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 29, 2024 | 1:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada Marathi serial update Akshara will find who is the real one between Bhuvaneshwari and Charulata

Saatvya Mulichi Saatvi Mulgi मालिकेत अक्षरा शोधणार चारुलता व भुवनेश्वरी यांच्यापैकी नक्की खरं कोण? नवीन प्रोमो व्हायरल

Tula Shikvin Changlach Dhada : छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात. मनोरंजनाच्या साधनातील एक महत्त्वाचा भाग म्हणून टीव्ही मालिकांकडे पाहिले जाते. त्यातील काही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. मालिकेच्या कथानकाबरोबर कलाकारांचा अभिनयदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. अशाच काही लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका.  या मालिकेत येणाऱ्या अनेक नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना कायमच उत्सुकता लागून राहिलेली असते. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत काही दिवसांपूर्वी अक्षरा व अधिपती यांच्या आयुष्यात चारुलताची एन्ट्री झालेली पाहायला मिळाली. चारुलताने सूर्यवंशांच्या घरात एन्ट्री केल्यानंतर अक्षरा व चारुहास यांनी तिला स्वीकारलं आहे. पण अधिपती चारुलताचा आई म्हणून स्वीकार करण्यास अजूनही तयार नाही. एकीकडे अधिपती चारुलताला स्वीकारण्यास तयार नाही पण दुसरीकडे अक्षरा मात्र त्या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहे. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यात अक्षराला चारुलताचे सत्य समजणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Saatvya Mulichi Saatvi Mulgi : केदारकडून मैथिलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, नेत्राने वाचवला जीव, राज्याध्यक्ष कुटुंबाला सत्य कळणार का?

मालिकेच्या या नवीन प्रोमोमध्ये चारुलता व भुवनेश्वरी एका मुखवट्यामागून अक्षराला त्या चारुलता व भुवनेश्वरी असल्याचे सांगतात. चारुलता तिच्या लूकमधून अक्षराला म्हणते की, “अक्षरा विश्वास ठेव मीच चारुलता आहे”. तर भुवनेश्वरीही अक्षराला असं म्हणते की, “चारुलताचे रूप घेतलेली मीच आहे भुवनेश्वरी”. यानंतर दोघी अक्षराला गोंधळात टाकतात. त्यामुळे अक्षरा पुरतीच गोंधळून जाते आणि यांतर मला त्रास होतो आहे असं म्हणते. पण पुढे ती चारुलता आणि भुवनेश्वरी यांच्यामागचं सत्य शोधणार असं म्हणते.

आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा

दरम्यान, मालिकेच्या या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी गायब आहे. ती गायब झाल्यानंतर चारुलताची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता दोघींमध्ये नक्की खरी कोण? किंवा या दोघीच एक आहेत का? की भुवनेश्वरीच चारुलता आहे? हे सत्य लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Tags: Marathi Serial Newstula shikvin changlach dhadaTula Shikvin Changlach Dhada Marathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
armaan malik fourth wife

युट्यूबर अरमान मलिकच्या चौथ्या लग्नाचं गुपित काय?, बायको पायलनेही केलं भाष्य, म्हणाली, "दोन बायका असूनही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.