रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : केदारकडून मैथिलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, नेत्राने वाचवला जीव, राज्याध्यक्ष कुटुंबाला सत्य कळणार का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 29, 2024 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saatvya Mulichi Saatvi Mulgi Marathi serial update Kedar attempts to kill Maithili new promo viral on social media

Saatvya Mulichi Saatvi Mulgi मालिकेत केदारकडून मैथिलीला जीवे मारण्याचा प्रयत्न, नवीन प्रोमो व्हायरल

Saatvya Mulichi Saatvi Mulgi : रहस्यमय कथानकामुळे प्रेक्षकांची आवडती झालेली मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. लिकेत इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर नेत्रा आणि अद्वैतमधे यावरून संवाद होतं. नेत्रा तिची चाललेली धडपड अद्वैतकडे व्यक्त करत सगळं सांगते. तेव्हाच घरात चारही बायकांचं एकमत होतं की घरातल्याना आपण एकत्र ठेवण्यातच खरा आनंद आहे. जिथे केतकी भरभरून बोलते आणि केतकीचा नवरा केदार घरात प्रवेश करतो. (Saatvya Mulichi Saatvi Mulgi Serial Update)

केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित उलगडलेलं नाही. केदारच्या येण्याने घरात सर्वांनाच आनंद होतो. पण काही जण त्याच्या घरातील एन्ट्रीवर शंका उपस्थित करतात. नेत्रा, इंद्राणी यांना आता केदारचा संशय येऊ लागल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सोमवारच्या भागात नेत्राच्या लेकीला एक वाईट स्वप्न पडतं. यात तिला एका बाईला एक माणूस धारदार शस्त्राने मारताना दिसतो.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – सूरज चव्हाण प्रचारसभेत, स्टेजवर जाऊन भाषणही केलं, अजित पवारांना पाठिंबा

मालिकेतील याच कथानकाचा एक प्रोमो समोर आला आहे आणि ऊयायत केदार मैथिलीवर हल्ला करतानाचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये नेत्राची मुलगी एक गाणं गाणारा माणूस मैथिलीला मारत असल्याचे सांगते. त्यानंतर दिवाळीच्या फटाक्यांमध्ये केदार मैथिलीवर हल्ला करत असताना नेत्रा तिथे पोहोचते आणि ती मैथिलीला वाचवते. “मैथिली मावशीला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे” असं म्हणत ती केदारला दूर सारते.

आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवीकोरी आलिशान कार, खास नावही ठेवलं अन्…; फोटो व्हायरल

त्यानंतर केदार नेत्राला “मी हे घर कायमचं तोडायला आलो आहे”. असं म्हणतो. यावर नेत्रा तीला उत्तर देत असं म्हणते की, “मी हे घर तोडायला आले आहे, पण मी या घरात माणसे जोडायला आले आहे”. सोशल मीडियावर हा प्रोमो चांगलाच व्हायरल होत असून आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आता नेत्रा, इंद्राणीचा केदारवरील संशय खरा ठरणार का? दिवाळीत राज्याध्यक्ष कुटुंबातलं अजून कोणतं रहस्य उघडकीस येणार, या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

Tags: Marathi Serial Newssaatvya mulichi saatvi mulgiSaatvya Mulichi Saatvi Mulgi Marathi Serial News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
salman khan death threat

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, 'त्या' व्यक्तीला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.