Shashank Ketkar Video : अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. याआधीही शशांकने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ केले आणि त्याच्या या व्हिडीओमुळे प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय अनेकदा शशांक बऱ्याच सामाजिक मुद्द्यांवरही भाष्य करताना दिसतो. काही दिवसांपूर्वी0 त्याने मालाड मालवणीमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रशासनाने दखल घेत तेथील कचरा उचलला. अशातच आता शशांकने काल त्याच्या ठाणे शहरातील कचऱ्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला होता.
या व्हिडीओनंतर अवघ्या २४ तासाच्या आता ठाणे महानगरपालिकेने दखल घेत तेथील कचरा उचलला. शशांकने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याचा व्हिडीओ शेअर करत ठाणे महानगर पालिकेचे आभार मानले आहेत. व्हिडीओ शेअर करत शशांक म्हणाला, “आपण मनापासून तक्रार केली आणि आपल्याला खरंच वाटत असेल की आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा तर तक्रार करावी, आपली तक्रार खरंच योग्य असेल तर त्याची नक्की दखल घेतली जाते. २४ तासाच्या आता महानगर पालिकेने ती जागा साफ केली. मी आता त्याच जागेवर उभा आहे जिथे काल निव्वळ कचरा, प्लास्टिक वगैरे होतं”.
आणखी वाचा – नवरा असावा तर असा! स्वतः करंज्या बनवत आहेत अविनाश नारकर, बायको म्हणाली, “कमाल आणि…”
पुढे तो म्हणाला, “मी आता पाहिलं तर ती संपूर्ण जागा साफ करण्यात आली होती. महानगर पालिकेचे खूप आभार. ठाणेच नाहीतर महाराष्ट्र, भारत आपण स्वच्छ ठेवूया. आणि आता मनापासून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा”. पुढे त्याने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन देत असं म्हटलं की, “आपण देशाचे नागरिक म्हणून सजग असू तर सगळं शक्य होतं. ठाणे महानगरपालिकेचे आभार. २४ तासाच्या आत तो परिसर स्वच्छ झाला. फुटपाथ हा कचऱ्यासाठी नसून आम्हाला चालण्यासाठी आहे हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. शुभ दीपावली”.
आणखी वाचा – वाढदिवसानिमित्त सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवीकोरी आलिशान कार, खास नावही ठेवलं अन्…; फोटो व्हायरल
शशांकने हा खास व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं होतं की, “सुप्रभात, दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळीकडेच छान रोषणाई आणि साफसफाई केली जात आहे. आमच्या ठाण्यात घाणेकर चौकातही स्वच्छता आणि रोषणाई आहे. तिथे मोठा डिजिटल स्क्रीन आहे, ज्यावर अनेक राज्यकर्त्यांच्या व बिल्डर्सच्या जाहीराती लावल्या जातात. त्यामुळे तो चौक मोठा असल्याने तिथे स्वच्छता ठेवली जाते. त्याजवळच मी राहत असलेल्या सोसायटीतही ठाणे महानगरपालिकेने स्वच्छता ठेवलेली आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. त्यामागे एक योजनाही आहे ती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो”. यापुढे शशांकने मैदानाजवळची काही दृश्ये दाखवली आहेत, ज्यात खूप कचरा असल्याचे पाहायला मिळत आहे. या कचऱ्यामध्ये दारूच्या बाटल्या, खराब गादी, खाऊचे पाकीट, प्लॅस्टिक, तंबाखू, फ्लेक्स, लाकूड, पेपर, थर्माकॉल आणि देव्हारा अशा काही वस्तू आहेत”.