शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या व्यावसायिकाला धक्का, कोटींची कार चोरी, सीसीटीव्हमध्ये दिसला संपूर्ण प्रकार

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 28, 2024 | 2:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Shilpa Shetty bastian restaurant outside car stoled footage captured in cctv

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटच्या बाहेरून उद्योगपतीची महागडी कार चोरीला गेली आहे

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटची मालक आहे. अलीकडेच शिल्पाच्या रेस्टॉरंटच्या बाहेर असे काही घडले ज्याची लोक स्वप्नातही कल्पना करू शकत नाहीत. तिच्या आलिशान रेस्टॉरंटसमोरून सुमारे १ कोटी किमतीची महागडी कार चोरीला गेली आहे. ही कार एका बड्या उद्यागपतीची असल्याचं म्हटलं जात आहे. रुहान खान असं त्याचं नाव आहे. कारच्या मालकाने या कार चोरीची तक्रार छत्रपती शिवाजी पार्क पोलिस स्थानक केली आहे. तक्रारीनुसार कार पार्किंग परिसरात पार्क केल्यानंतर काहीच मिनिटात चोरीला गेली आहे. (Shilpa Shetty Restaurant Outside Car Stoled)

रुहान खान २७ ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजता मित्रांबरोबर दादरमधील बॅस्टियन रेस्ट्रॉरंट क्लब मध्ये पोहोचले होते. त्यांनी त्यांची कार रेस्ट्रॉरंटच्या स्फाटकडे पार्किंगसाठी दिली. तिथल्या कर्मचाऱ्यानं ती कार बेसमेंटमध्ये पार्क केली. कार पार्क केल्यानंतर काहीच मिनिटांत तिथं जीममध्ये दोनजण बेसमेंटमध्ये पार्किंग परिसरात आले होते. त्यांनी ही पार्क केलेली बीएमडब्ल्यू कार चोरी केली. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. पहाटे चार वाजता जेव्हा क्लब बंद झाला, तेव्हा रुहान यांनी रेस्ट्रॉरंटच्या स्फाटला कार घेऊन येण्यास सांगितलं. तेव्हा कार गायब झाल्याचं समोर आलं.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज, पतीच्या निधनानंतर अवस्था वाईट, मुलाने सांगितलं, “परिस्थिती गंभीर…”

त्यानंतर रुहान यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. या कारचा तपास करण्यासाठी आता त्या परिसरातले सीसीटीव्ही पोलिस तपासत असल्याचं म्हटलं जात आहे. शिल्पा शेट्टीचे बॅस्टियन हे अलिशान रेस्टॉरंट पूर्वी वरळी परिसरात होतं, मात्र ते बंद झाल्यानंतर आता दादरमधील कोहिनूर टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजेच ४८व्या मजल्यावर स्थलांतरित झालं आहे.  अनेक सेलिब्रिटींचंही हे आवडतं ठिकाण बनलं आहे. अनेक लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्री इथं पार्टी करताना दिसतात.

आणखी वाचा – “मी जिवंत आहे आणि…”, नीना कुळकर्णींच्या मृत्यूच्या अफवा, अभिनेत्रीचा संताप, म्हणाल्या, “मृत्यूविषयीची बातमी…”

त्यामुळं तिथं सुरक्षाही तगडी असते. पण आता याच रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून महागड्या कारची चोरी झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. तसेच रुहान खानचे वकील अली काशिफ यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आणि रेस्टॉरंट निर्धारित वेळेपेक्षा उघडे राहिल्याबद्दल निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर खुलेआम दारू पिणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tags: Car theft from outside Shilpa Shetty's restaurant newsShilpa Shetty Restaurant Outside Car StoleShilpa Shetty's restaurant Car theft
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Shiva serial fame actress Purva Kaushik expressed her feelings on receiving the Zee Marathi Award 2024

"आयुष्यातील हळवा क्षण…", 'शिवा'ला पुरस्कार मिळताच भावुक पोस्ट, स्टेजवरही रडली, म्हणाली, "सातत्याने काम…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.