भाग्य दिले मालिकेत सध्या एकामागोमाग एक टर्निंग पॉईंट आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. मालिकेत केसचा निकाल हा मोहितेंच्या बाजूने लागलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच राज कावेरी आणि रत्नमाला याना माहेरचा चहाच्या ऑफिसमध्ये घेऊन येतो. (Bhagya Dile Tu Mala Epk)
त्यावेळी सानिया आणि आकांशा आरतीचे ताट घेऊन त्यांचं स्वागत करायला येतात. तेव्हा राज सानियाला आई आणि कावेरीची पाय धुवायला सांगतो. त्यानंतर सानिया जेव्हा रत्नमाला आणि कावेरी यांची माफी मागत सांगते की, माझं चुकलं, हा माहेरचा चहा तुमचाच आहे. त्यानंतर राज सानियाला पाय धरून माफी मागायला सांगतो.
पाहा काय घडलंय मालिकेच्या आजच्या भागात (Bhagya Dile Tu Mala Epk)
भाग्य दिले तू मला मालिकेच्या आजच्या भागात जेव्हा राज रत्नमाला आणि कावेरीला घेऊन माहेरचा चहाच्या ऑफिसमध्ये येतो तेव्हा सानिया रत्नमालाचे पाय धरून माफी मागते. त्यानंतर सगळेच जण ऑफिसमध्ये येतात, तेव्हा सानिया बोलते, तुमचं सेलिब्रेशन करून झालं असेल तर मी निघू का त्यावर रत्नमाला तिला सांगतात आग थांब निघतेयस कशाला. (Bhagya Dile Tu Mala Epk)
त्यानंतर पाहायला मिळतेय की, कावेरी पूढे येऊन सानियाचा तर रत्नमाला आकांक्षाचा हात पकडून त्यांना खडेबोल सुनावतात, कावेरी सानियाचा चांगलाच पाहुणचार करताना दिसतेय, ती सानियाला बोलतेय की, आजपर्यंत तू आम्हाला खूप धमक्या दिल्या आहेस, पण तेव्हा तू हा विचार नाही केलास की ही वेळ जर तुझ्यावर आली तर काय होईल, आजवर तू आमचा चांगला स्वभाव आता शिक्षा देणारा, अन्यायावर वाचा फोडणारा स्वभाव ही पाहशील, असं म्हणून सानिया आणि आकांक्षाला बाहेरचा रस्ता दाखवतात. (Bhagya Dile Tu Mala Epk)
हे देखील वाचा – भावंडांना ऐअरपोर्ट वर बघून पूजा सावंतला अश्रू अनावर
त्यावेळी सानिया आणि आकांक्षाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. त्यानंतर रत्नमाला बच्चू मामा, आदित्यचे आभार मानतात. आता माहेरचा चहा हे मोहितेंच्या हातात आलेलं असत आता सानिया आकांक्षाचा अपमान झाल्याने त्या कोणता नवा डाव आखणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.
