रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi फेम सूरज चव्हाणची कामाला सुरुवात, शूटलाही गेला, फिल्मसिटीबाहेरील फोटो समोर

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 25, 2024 | 11:09 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi 5 fame Suraj Chavan started shooting shared photo on Instagram story

Bigg Boss Marathi 5 फेम सूरज चव्हाणची शूटिंगला सुरुवात, फोटोही केला शेअर

मोढवे या लहानशा गावातून टिकटॉक स्टार आलेला सूरज चव्हाण आज संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात ग्रँड प्रीमियरला १६ व्या क्रमांकावर म्हणजेच सगळ्यात शेवटी त्याने प्रवेश केला होता. यावेळी ‘मीच घरातून शेवटी बाहेर पडेन आणि ट्रॉफी जिंकेन’ असा निर्धार त्याने केला होता. अखेर सूरजने त्याचा शब्द खरा करून दाखवला आणि त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. सूरजने असंख्य अडचणींवर मात करत यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीचं निधन झाल्याने सूरजला शिक्षण घेता आलं नाही. मोठ्या बहिणीने याचा सांभाळ केला. (Suraj Chavan Shooting Start)

‘बिग बॉस’च्या घरात पॅडी आणि अंकिता यांनी त्याला सगळे टास्क समजावून सांगितले. पंढरीनाथ आणि सूरजच्या सुंदर मैत्रीची तर सीझनभर प्रचंड चर्चा झाली. ‘टीम बी’ने सूरजला पहिल्या दिवसापासून भक्कम साथ दिली आणि या सगळ्या सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्याला ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकता आली. सूरज चव्हाण विजेता होताच त्याला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली. एवढेच नाही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.

आणखी वाचा – Bigg Boss 18 : विवियन, मुस्कान, नायरा, अविनाश व रजत यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?

अशातच सूरजने त्याच्या आगामी शूटिंगला सुरुवात केली आहे, असं दिसत आहे. सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमधून त्याने आगामी शूटिंगला सुरुवात केली असल्याचे म्हटलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने “On The Way To Film City” असं म्हटलं आहे. तसंच या फोटोमध्ये त्याने गाडीसमोरील गणपती बाप्पाचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, सूरज फिल्मसिटीला नक्की कोणत्या शूटसाठी गेला आहे. याची काही माहिती समोर आलेली नाही. पण त्याच्या आगामी शूटिंगसाठी त्याचे चाहते वाट पाहत आहेत हे नक्की…

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : केदारच्या येण्याने शेखर अस्वस्थ, इंद्राणीचा सत्य शोधण्याचा प्रयत्न, नेत्राला नवं रहस्य कळणार का?

सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर बक्षीस म्हणून त्याला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफीही. तसेच दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईक मिळाली. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचे वेगळेपण दाखवले. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्यातही त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली.

Tags: Bigg Boss Marathi 5 Suraj ChavanSuraj Chavan Marathi NewsSuraj Chavan Shooting Start
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Suraj Chavan and Jahnavi Killekar

नातं जपलं! सूरज चव्हाणच्या गावी पोहोचली जान्हवी किल्लेकर, फोटो शेअर करत म्हणाला, "लाडकी ताई…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.