शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Navri Mile Hitlerla : जहागीरदारांचं घर सोडून गेली लीला, ऐजेंना येत आहे आठवण, पुन्हा परतणार का?

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 24, 2024 | 4:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla Marathi serial update AJ misses Leela after leaving jahagirdar home

Navri Mile Hitlerla मालिकेत जहागीरदारांचे घर सोडून गेल्यानंतर एजे लीलाला करत आहे मिस

Navri Mile Hitlerla Serial : टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या काही मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या असतात. शा मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आहे. या मालिकेतील कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. कधी एजे व लीला यांच्यामधील मैत्री, कधी त्यांच्यात निर्माण होणारे गैरसमज, तर संकटात अभिरामने लीलाला केलेली मदत अशा कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. जहागीरदार कुटुंब परदेशात फिरायला गेले असताना त्यांच्यातील प्रेम अधिक बहरल्याचे पाहायला मिळाले. तसेच अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (Navri Mile Hitlerla Serial Update)

त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला होता. अशातच आता मालिकेत एक अनपेक्षित वळण आले आहे. ते म्हणजे लीलाने जहागीरदारांचे घर सोडले आहे. मालिकेत नुकत्याच झालेल्या भागात लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली आहे. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून त्याने यावेळी लीलाला असं म्हटलं की, “तु माझ्या आणि अंतराच्या मध्ये येणार असशील तर तुला या घरात जागा नाही. तुला मी शेवटचे सांगत आहे, तुला जर या घरात अंतराची जागा न घेता फक्त लीला म्हणून राहायचे असेल तरच राहा. नाहीतर इथून जा”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – The Family Man 3 च्या प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर, ‘या’ दिवशी येणार मनोज वाजपेयीची गाजलेली सीरिज, जाणून घ्या…

यानंतर बुधवारच्या भागात लीला बॅग घेऊन जहागीरदारांच्या घराबाहेर पडली. अशातच आता मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यात एजे लीलाला मिस करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये एजेला त्याचा पीए कॉफी आणून देतो. पण एजे “मला कॉफी स्ट्रॉंग लागते” असं म्हणत त्यात दूध व साखर नको असल्याचे सांगतो. यावर तो पीए “इतकं कोण लक्षात ठेवेल?” असं म्हणतो. तेवढ्यात एजेकडून चुकून लीलाचे नाव येते. पुढे एजे ऑफिसला जात असताना बॅगमध्ये काहीतरी शोधत असतो, तेव्हा त्याची आई त्याला “काही राहीलं आहे का?” असं विचारते. तेव्हा एजे असं म्हणतो की, “लीला दरवेळेस काहीतरी गोंधळ घालते”.

आणखी वाचा – अरमान मलिकने गुपचूप उरकलं चौथं लग्न?, मुलांना सांभाळणाऱ्या व्यक्तीशीच जुळलं प्रेम, पायल-कृतिकाचं काय होणार?

यावर लीलाचे आई त्याला असं म्हणते की, “तू कितीही नाकारलं तरी तुला लीलाची सवय झाली आहे हेच खरं आहे. तू मान्य कर किंवा नको करु. तुला लीलाची सवय लागली असून तुला तिची आठवण येत आहे”. यानंतर एजे लीलाचा विचार करु लागतो. त्यामुळे एजे लीलावर त्याचे प्रेम असल्याचे मान्य नसला तरी त्याला तिची आठवण येत आहे आणि त्याचे तिच्यावर प्रेम आहे हे नक्की. त्यामुळे आता या दोघांच्या नात्यात पुढे काय होणार? हे पाहायची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहली आहे.

Tags: Navri Mile HitlerlaNavri Mile Hitlerla NewsNavri Mile Hitlerla Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Hema Sharma Bigg Boss 18

पोटच्या लेकाला विकण्यासाठी तयार, रात्री घरातून गायब व्हायची अन्…; Bigg Boss 18 फेम अभिनेत्रीवर नवऱ्याचे गंभीर आरोप

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.