रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लक्ष्मी आली घरा! सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, लग्नाच्या नऊ वर्षांनी दिली गुडन्यूज

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 23, 2024 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Madhubala serial fame Hindi actress Drishti Dhami given birth to a daughter

‘मधुबाला’ मालिका फेम हिंदी अभिनेत्री दृष्टी धामीने मुलीला जन्म दिला आहे

मनोरंजन सृष्टीतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी आणि तिचा पती नीरज खेमका यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. ‘मधुबाला’ फेम अभिनेत्रीची गरोदरपणाच्या १० व्या महिन्यात प्रसूती झाली असून तिने एका मुलीला जन्म दिला आहे. अभिनेत्रीला कन्यारत्न प्राप्त होतच सोशल मीडियासह सर्वच माध्यमातून तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तिचे अनेक चाहते मंडळी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. (Drishti Dhami Mother)

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या घरी कन्या आल्याची बातमी सांगितली आहे. दृष्टी धामीने लेकीच्या जन्माची गुडन्यूज देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “ती आली आहे. २२ ऑक्टोबर २०२४. स्वर्गातून थेट आमच्या हृदयात. एक नवीन जीवन. एक नवीन सुरुवात”. दृष्टीच्या या पोस्टवर चाहते मंडळी व कलाकार मंडळींकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. अनेकांनी तिला या पोस्टखाली कमेंट्स मध्ये अभिनंदन असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Drashti Dhami 💜 (@dhamidrashti)

आणखी वाचा – “चित्रपटावर अन्याय होतोय आणि…”, सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’वर बंदी आणण्याची मागणी, म्हणाला, “आधी चित्रपट बघा आणि…”

तिची मैत्रिण सनाया इराणीने लिहिले, ‘माझी मुलगी आली आहे.’ शक्ती अरोरा यांनी अभिनंदन केले. जेनिफर विंगेट, रुबिना दिलीक, नकुल मेहता, करण ग्रोव्हर, दिशा परमार, आदिती गुप्ता, पूजा गौर, सुमोना चक्रवर्ती, मौनी रॉय, सुरभी ज्योती, किश्वर मर्चंट यांच्यासह अनेक चाहत्यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. यापूर्वी, दृष्टी धामीने एक मजेदार पोस्ट शेअर केली होती की ४१ आठवडे झाले आहेत आणि बाळ अद्याप बाहेर आलेले नाही. आता तर ती चिडचिडही झाली आहे. याच पोस्टवर राहुल वैद्य यांची पत्नी दिशा यांनी सांगितले की, त्यांच्या बाळाला इतकी घाई होती की ते ३७ व्या आठवड्यातच बाहेर आले.

आणखी वाचा – 23  october Horoscope : मेष, वृषभ व मीन या राशींसाठी बुधवारचा दिवस शुभ असेल, इतरांच्या नशिबात काय? जाणून घ्या…

दरम्यान, लग्नाच्या नऊ वर्षांनी दृष्टी आई झाली आहे. तिने ‘दिल मिल गए’, ‘गीत’, ‘मधुबाला’, ‘एक था राजा एक थी रानी’ आणि ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘झलक दिखला जा ६’ हा डान्स शो जिंकला आहे. २१ फेब्रुवारी २०१५ रोजी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केले. लग्नाच्या ९ वर्षानंतर ती आई झाली.

Tags: Drishti DhamiDrishti Dhami Girl BirthDrishti Dhami Mother
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : दामिनीचा संशय खरा ठरणार, पारू-आदित्यला एकत्र पाहून बसला धक्का, सत्य सर्वांसमोर आणणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.