शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कायम खंत राहिल की…”, सूनेची अश्विनी एकबोटेंसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “आशुआई तुला भेटले नाही पण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 22, 2024 | 5:54 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
late actress Ashwini Ekbote death anniversary of daughter-in-law and Amruta Bane shared an emotional post

दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंच्या पुण्यतिथीनिमित्त सून व अभिनेत्री अमृता बनेने भावुक पोस्ट शेअर केली आहे

‘दुर्वा’, ‘राधा ही बावरी’, ‘असंभव’, ‘कशाला उद्याची बात’ अनेक लोकप्रिय मालिकांमधून आणि ‘बावरे प्रेम हे’, ‘तप्तपदी’, ‘आरंभ’, ‘क्षण हा मोहाचा’ आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दिवंगत अभिनेत्री म्हणजे अश्विनी एकबोटे. अभिनयाबरोबच त्या एक उत्तम नृत्यांगनाही होत्या. भरतनाट्यम नृत्यांगणा अश्विनी एकबोटे यांचं २२ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. पुण्यातील भरत नाट्यमंदिर येथे ‘नाट्य त्रिविधा’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना अश्विनी एकबोटे रंगमंचावर कोसळल्या. हृदयविकारच्या झटक्याने त्यांचं वयाच्या ४४व्या वर्षी निधन झालं आणि आज त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांचे अनेक चाहते त्यांची आजही आठवण काढतात. अशातच आज अश्विनी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची सून व अभिनेत्री अमृता बनेने आपल्या सासूसाठी भावुक पोस्ट लिहिली आहे. (Ashwini Ekbote Death Anniversary)

अमृताने अश्विनी यांच्या फोटोबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “प्रिय आशुआई, आजचा दिवस कॅलेंडरमधून काढून टाकता तर नाही येणार पण तुझी आठवण? त्याचं काय? एका दिवसापूर्ती नाही ती… खरं तर तुला कधी भेटता नाही आलं, तुझ्याशी बोलता नाही आलं, तुझं नृत्य म्हणजे तुझा श्वास कधी प्रत्यक्ष पाहता नाही आला. याची माझ्या मनात कायम खंत कायम राहील. तुला माहित आहे, आज जिथे तू वावरलीस, तिथे म्हणजे आपल्या घरी जेव्हा जेव्हा मी असते तेव्हा अस वाटतं आशुआईने ह्याच कपाटाला हात लावला असेल ना?, याच स्वयंपाकघरात अन्नपुर्णेसारखा सगळ्यांचा पोटोबा शांत केला असेल?, याच जिन्यावरून फोटोज काढले असतील. आज त्या प्रत्येक निर्जीव गोष्टीला हाताळताना तू त्याच्यात जो जीव ओतून गेली आहेस त्यामुळे का होईना मला तुला भेटता येतं, तुझ्याशी बोलता येतं”.

View this post on Instagram

A post shared by Amruta Bane (@amruta.bane14)

यापुढे अमृताने असं म्हटलं आहे की, “तुला माहित आहे, लग्नाच्या आधी म्हणजे गेल्या दिवाळीला मी अंधेरीला छान रांगोळी काढली होती, त्यावर शेजारच्या काकू म्हणाल्या, “अरे वाह, आज तुला शुटींगला सुट्टी आणि त्यात सुंदर रांगोळी काढली आहेस! मग आता व्हिडीओ कॉल करुन दाखवशील ना तुझ्या सासूबाईंना?.” ठिकेऽऽऽऽऽ. मला माहीत आहे ती तात्पुरती रांगोळी तुला दाखवता नाही आली. पण शुभंकर आणि मी मिळून आयुष्यभरासाठी जी कायमस्वरूपी संसाराची रांगोळी काढायला घेतली आहे ती नक्कीच तू पाहत आहेस आणि कुठे कुठले रंग भरायचे हेसुद्धा सांगत आहेस”.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत अधिपतीकडून अक्षरासाठी खास सरप्राईज भुवनेश्वरीचा लूक करणार अन्… ; नवीन प्रोमो व्हायरल

यापुढे अमृताने यात असं म्हटलं आहे की, “रोज रात्री बाबा, शुभंकर आणि माझा व्हिडीओ कॉल होतो तेव्हा स्क्रीनवरचा तुझा चौकोन व्हॉट्सपवर नाही तर आमच्या मनात आहे आणि या व्हिडीओ कॉलला नेहमीच रेंज असेल आणि हो तुझा नादिष्ट शुभंकर एकबोटे सगळं छान सांभाळून घेत आहे. बाबाही कुठलीही परिस्थिती असो सगळं सोपं करुन टाकतात. जिथे आहेस तिथे छान रहा आणि हो तिथे तरी स्वतःची दगदग करुन घेऊ नको. तुला खूप सारं प्रेम आणि गोड पापा”.  

आणखी वाचा – Tharla Tar Mag : अर्जुन-सायलीचे एकमेकांवर प्रेम पण गैरसमजामुळे दोघे दुरावणार? नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, मोठा ट्विस्ट

अमृताच्या या पोस्टखाली अविनाश नारकरांनीही कमेंट करत असं म्हटलं आहे की, “व्वा अमृता… अगं किती छान… किती गोड व्यक्त केलयंस स्वतःला बाळा..!! अशीच एकरूप… त्या घरात एकजीव होऊन रहा. अश्विनीसारख्या पुण्यात्म्याचं व्यक्तित्व, कार्यकर्तृत्त्व, तुझ्यात कणाकणाने झिरपूदे, म्हणजे तिच्या न विसरता येणाऱ्या स्मृति तुझ्या रूपाने सगळ्यांबरोबर राहतील. विनम्र अभिवादन”.

Tags: Amrita BaneAmruta Bane Emotional Post for Ashwini EkboteAshwini Ekbote Death Anniversary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
Suraj Chavan On His Movie

"चित्रपटावर अन्याय होतोय आणि…", सूरज चव्हाणच्या 'राजा राणी'वर बंदी आणण्याची मागणी, म्हणाला, "आधी चित्रपट बघा आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.