Sonakshi Sinha Mangalsutra Price : देशभरात करवा चौथ अगदी जोरदार साजरी करण्यात आली. बॉलीवूडमध्येही, विवाहित अभिनेत्रींनी आपल्या पतींसाठी उपवास ठेवला आणि नववधूंसारखे कपडे परिधान करत करवा चौथ साजरी केली. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचा हा पहिलाच करवा चौथ होता. झहीर इक्बालबरोबर लग्नानंतर सोनाक्षी सिन्हानेही पहिल्यांदा करवा चौथ साजरा केला. यावेळी तिने नवविवाहित वधूप्रमाणे पारंपरिक लूक केला होता. या तिच्या लूकमध्ये एक गोष्ट चर्चेत राहिली ती म्हणजे तिचे मंगळसूत्र. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. यावेळी अभिनेत्रीने लाल रंगाची साडी परिधान केली होती.
हातात बांगडी, कपाळावर लाल बिंदी आणि कपाळावर सिंदूर लावून ती एखाद्या नव्या नावरीसारखी दिसत होती. यावेळी अभिनेत्री तिचे मंगळसूत्र फ्लाँट करताना दिसली. लग्नानंतर सोनाक्षीच्या गळ्यात मंगळसूत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. करवा चौथचा लूक शेअर करत सोनाक्षी सिन्हाने लिहिले “आज व दररोज तुझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. करवा चौथच्या शुभेच्छा श्रीमान पती झहीर इक्बाल. प्रेमाचे हे चिरंतन प्रतीक- माझे मंगळसूत्र. आमच्या वचनबद्धतेची कायमस्वरुपी स्मृती असू दे”. सोनाक्षी सिन्हाचं हे मंगळसूत्र मोती व हिऱ्यांनी जडलेला आहे. BVLGARI च्या अधिकृत वेबसाइटनुसार, या 18K rose gold मंगळसूत्राची किंमत १३ लाख ६० हजार रुपये आहे.
आणखी वाचा – “शिमग्यातील सोंग कुठेय?”, अविनाश नारकरांना नेटकऱ्याने डिवचताच भडकल्या ऐश्वर्या, म्हणाल्या, “भोसले नावाचं…”
सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये ती झहीर इक्बालबरोबर मस्ती करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की, झहीरने तिच्यासाठी करवा चौथचा उपवासही धरला होता. सोनाक्षी सध्या ती तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. २३ जून रोजी ती तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. सोनाक्षी व झहीरचे लग्न नोंदणी पद्धतीने मुंबई येथे येथे पार पडले. त्यानंतर त्यांनी बॅस्टीयन रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता.
या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील कलाकारांनी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या या सोहळ्याची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. मात्र सोनाक्षीने एका मुस्लिम मुलाबरोबर लग्न केल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिकादेखील करण्यात आली. अनेकांनी या विवाहाला लव्ह जिहादचेदेखील नाव दिले. पण या सगळ्या चर्चाकडे लक्ष न देता ती झहीरबरोबर सुखात असल्याचेही तिने सांगितले.