रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शिमग्यातील सोंग कुठेय?”, अविनाश नारकरांना नेटकऱ्याने डिवचताच भडकल्या ऐश्वर्या, म्हणाल्या, “भोसले नावाचं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2024 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar On Trolling

नेटकऱ्याच्या कमेंटवर ऐश्वर्या नारकर भडकल्या

Aishwarya Narkar On Trolling : ट्रोलिंग हे काही कलाकारांना नवं नाही. कलाकार म्हटलं की ते अनेकदा ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेले दिसतात. बरेचदा अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी या ट्रोलिंगकडे सडेतोड उत्तर देतात. तर काही वेळा या ट्रोलिंगकडे ही कलाकार मंडळी दुर्लक्ष करताना दिसतात. या ट्रोलिंगमध्ये एक मराठमोळं व लोकप्रिय जोडपं नेहमीच अडकले जातात, ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. नारकर कपल हे नेहमीच ट्रोलिंगच्या वादात अडकलेले दिसले आहेत. आता पुन्हा एकदा या जोडीला नेटकऱ्याने डिवचताच ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून या दोघांना ओळखलं जातं. आजवर ऐश्वर्या व अविनाश यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय ही जोडी लोकप्रिय गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. या दोघांच्या डान्स व्हिडीओवर मिलियनच्या घरात व्ह्यूज येतात असं जरी असलं, तरीही अनेकदा या जोडप्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यच्या नात्याची अहिल्यादेवींना शंका, दामिनीने विष कालवलं अन्…; सून म्हणून स्वीकार करणार का?

अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या या एकट्याच व्हिडीओ बनवताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पडताच एका नेटकऱ्याने केलेल्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. दरम्यान, नेटकऱ्याच्या या कमेंटवर ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या यांच्याबरोबर या व्हिडीओमध्ये अविनाश नारकर दिसत नसल्याने नेटकऱ्याने कमेंट करत त्यांना डिवचलं आहे.

आणखी वाचा – शशांक केतकरने मालाडमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMC ने घेतली दखल, साफसफाई बघून म्हणाला, “सगळे मिळून…”

“ते शिमग्यातील सोंग कुठे आहे”, अशी कमेंट नेटकऱ्याने केली आहे. यावर ऐश्वर्या भडकलेल्या दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याची ही कमेंट इन्स्टाग्रामला स्टोरीमध्ये पोस्ट केली आहे. आणि त्यावर कॅप्शन देत नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. “स्वतःची लायकी सिद्ध करताय का?, भोसले नावाचं काहीतरी कर्तृत्व असुद्या”, असं म्हणत ऐश्वर्या यांनी नेटकऱ्याला ठणकावलं आहे.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar On Trollingmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Navri Mile Hitlerla serial update Leela and AJ misunderstanding new promo viral

Navri Mile Hitlerla : प्रेम बहरता बहरता एजे-लीलामध्ये होणार गैरसमज, नात्यात पुन्हा दुरावा येणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.